शाळेत शिकताना, अभ्यास करताना मुलांच्या हातात स्मार्ट फोन कशाला?

Image:familyeducation

स्मार्टफोन हाताळणारी मुलं घरोघरी दिसतात.  अभ्यास, मैदानावरचे खेळ, अवांतर वाचन यासारख्या गोष्टी टाळून मोबाइलवर तासनतास गेम खेळत राहाणं अनेक मुलांना खूप आवडतं. तुम्हालाही मोबाइल खेळायला आवडतो का? इतकंच नाही तर अनेक देशातली मुलं शाळेत देखील मोबाइल घेवून जातात. वर्गात शिक्षक शिकवत असताना मुलांच्या समोर मोबाइल असतो. हा मोबाइल अनेक प्रकारे मुलांचं शिकवण्यावरचं लक्ष उडवतो. स्मार्टफोनचा मुलांच्या शिक्षणातला अडथळा आणि धोका ओळखूनच आतंरराष्ट्रीय संस्थांनी मुलांचा स्मार्टफोन वापर, त्याचा त्यांच्या शिकण्यावर, आकलनावर आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होणारा नकारात्मक परिणाम बघून  त्यावर गंभीर विचार करायला आणि पावलं टाकायला सुरुवात केली आहे.  मुलांच्या शिक्षणात स्मार्टफोनमुळे येणारा अडथळा दूर करण्यासाठी शाळेतील मुलांनी शाळेत मोबाइल नेता कामा नये, असं युनेस्कोने म्हटलं आहे. त्यानुसार अनेक देशांत मुलांना शाळेत स्मार्ट फोन नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा!

शाळेत मुलांच्या हातात स्मार्ट फोन का नको?

'द युनायटेड नेशन्स एज्युकेशन, सायन्स ॲण्ड कल्चरल एजन्सीस' म्हणते की मोबाइल वापरत नाही म्हणून तो शांत राहातो असं नाही. सतत नोटिफिकेशन्सचे आवाज शिकवण्यावरचं लक्ष  क्षणार्धात उडवतात.  आणि पुन्हा लक्ष शिकण्याकडे केंद्रित होण्यास २० मिनिटं लागतात.

मुलांच्या शिकण्यात स्मार्टफोन कसा अडथळा निर्माण करतात यावर जगभरातल्या आंतरराष्टीय संस्थांनी अभ्यास करुन वेगवेगळी आकडेवारी आणि अहवाल प्रसिध्द केले आहे. 'प्रोग्राम फाॅर इंटरनॅशनल स्टुडण्ट असेसमेण्ट'ने तंत्रज्ञानाचा (टेक्नाॅलाॅजी) अती वापर आणि मुलांची शालेय प्रगती यांच्यात नकारात्मक संबंध असल्याचे म्हटले आहे. शाळेत शिकताना स्मार्ट फोन जवळ बाळगणाऱ्यांच्या शिकण्यावर नकारात्मक परिणाम होतो हे १४ देशांतील शाळांमध्ये केलेल्या पाहाणीतून दिसून आलं आहे. त्यामुळेच अनेक देशांनी मुलांना शाळेत स्मार्ट फोन आणण्यास बंदी घातली आहे. बेल्जियम, स्पेन आणि इंग्लड देशातल्या शाळांना मुलांना शाळेत स्मार्ट फोन आणण्यास बंदी घातली आहे.

या बंदी घातलेल्या शाळांचं काही महिन्यांनंतर निरीक्षण केलं असता या शाळांमधील मुलं जास्त लक्षपूर्वक शिकत असल्याचं अभ्यासकांना दिसून आलं आहे.

शाळेत शिकवताना तंत्रज्ञानाचा (वापर करताना काही मार्गदर्शक सूचना करायला हव्यात असा आग्रह युनेस्कोने जगभरातल्या शाळांकडे केला आहे.

शैक्षणिक उद्देशाने शिकवताना तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्याचा नकारात्मक परिणाम मुलांच्या आरोग्यावर, त्यांच्या सामाजिकीकरणावर होत असल्याचं अभ्यासकांना आढळलं आहे.

शाळेत विशिष्ट गोष्ट शिकवताना तंत्रज्ञानाचा वापर केल्यास जे शिकवतोय ते परिणामकारकपणे शिकवणं शक्य आहे, त्याचा मुलांच्या आकलनावर चांगला परिणाम होत आहे..  हे असं तीव्रपणे शाळांना वाटलं तरच शिक्षकांनी  शाळेत तंत्रज्ञानाचा  मर्यादित वापर करण्यास युनेस्कोने परवानगी दिली आहे.

कोरोनानंतर जगभरातल्या शाळांनी शिकवताना तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात केली. पण टेक्नाॅलाॅजीने मात्र प्रत्यक्ष शिकवणे, शिक्षकांच्या शिकवण्याच्या भूमिकेला पर्याय निर्माण केला नाही. विद्यार्थी समोर उभे राहून जे शिक्षक शिकवतात त्यांच्या शिकवण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करु शकातात,  हे अभ्यासाद्वारे सिध्द झाले आहे. जितका जास्त स्क्रीन टाइम तितकी मुलांची अभ्यासावरची एकाग्रता कमी होते. अशा मुलांमध्ये जिज्ञासा निर्माण होत नाही. त्यांच्या भावनिक स्थिरतेवर परिणाम होतो. त्यांच्या मनात भीती आणि नैराश्य या भावना निर्माण होण्याचा धोका मोठा असतो.

१८ वर्षांखालील मुलांनी दिवसातले जास्तीत जास्त दोन तास स्मार्टफोनचा वापर कारावा. असं ' सायबर स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ चायना'ने सांगितलं आहे. अल्पवयीन मुलांना १० ते ६ या वेळेत इंटरनेटच्या सुविधा मिळायला नकोत असा प्रस्तावही दिला आहे.

Image: freepik

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact