पृथ्वीचं तापमान वाढल्याने कोणाचं काय नुकसान होणार आहे?

पृथ्वीचं वय हे लाखों वर्षं आहे.

image : google

या लाखों वर्षांत पृथीचं तापमान अनेकदा वाढलं आणि कमीही झालं. म्हणजे अक्षरशः पृथ्वी तापली आणि थंडही झाली. मात्र आजवरच्या माणसाच्या इतिहासात पृथ्वी तापण्याचा जो काही वेग होता त्यापेक्षा आज अधिक वेगाने तापमानवाढ होते आहे.
पृथीलगतच्या हवेचं तापमान हे गेल्या शंभर वर्षात २ डिग्री फॅरनहीटने वाढलं आहे. दोन डिग्री फॅरनहीट म्हणजे किती सेल्सिअस? आपण सेल्सिअसमध्ये समजून घेऊया. कारण भारतात आपण सगळीकडे तापमान मोजण्यासाठी दशमान पद्धतीतील सेल्सिअस हे एकक वापरतो. तर समजा एखाद्या ठिकाणचं तापमान ४० डिग्री सेल्सिअस आहे. तर ते फॅरनहीटमध्ये होतात ११४. आणि त्यात दोन डिग्री फॅरनहीट वाढले. म्हणजे ११६ डिग्री फॅरनहीट तापमान झालं तर ते सेल्सिअसमध्ये होतं, ४१. ११११.

 

हेही वाचा!

अबब! ओझोनच्या छत्रीला पडलेल्या छिद्राचा आकार २ कोटी ६० लाख चौरस कि.मी.. हे कसे?

असं बघायला गेलं, तर वाटतं की थोडासाच तर फरक आहे. एखाद-दोन डिग्री तापमान कमी जास्त झालं तर एवढं काय त्यात? पण या कायमच्या वाढलेल्या तापमानाचा पृथ्वीवरील एकूण सजीवसृष्टीवर होणारा परिणाम हा फार जास्त व्यापक आणि सखोल असतो.

काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले? लग्गेच कळवा! -कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact