
Image: disclosetv
निसर्गात अशा काही गोष्टी घडतात ज्या चमत्कारच वाटतात. आता ५ नोव्हेंबर २०२३ रोजी (म्हणजे कालच्या रविवारी) बल्गेरियामध्ये असंच काहीसं घडलं. बल्गेरिया हे युरोप खंडातलं जुनं राज्य म्हणून ओळखलं जातं. आता हा देश बाल्कन देश म्हणून ओळखला जातो. युरोप खंडातील सर्वात आग्नेयकडील बाल्कन द्वीपकल्पातील राष्ट्र म्हणजे बल्गेरिया. तर बल्गेरियात पहाटे संपूर्ण आकाश काही तास लाल रंगानं भरुन गेलं होतं. या लालभडक आकाशाचे फोटो सोशल मीडियामुळे मग जगभर पसरले. सर्वात आधी बल्गेरियाच्या ईशान्य भागातील आकाशात लाल प्रकाश पसरला. त्यानंतर या लाल प्रकाशाने इतर बाल्कन प्रदेशातलं आकाशही व्यापलं. असं लालभडक आकाश काहींना खूप विचित्र, भयंकर आणि काहीतरी वाईट घडणार असल्याचं चिन्हं वाटलं तर काहींना हे दृष्य अतिशय मनमोहक वाटलं. ही निसर्गाची जादू असल्या काहीजण म्हणत होते.
हेही वाचा !
लाल आकाश बल्गेरिया सोबतच रोमानिया, हंगेरी, झेक प्रजासत्ताक आणि युक्रेन या देशातही दिसलं. पोलंड, स्लोव्हाकिया या देशात आकाशात लखलखीत हिरवा प्रकाश पडला होता तर इंग्लडमध्ये शनिवारी रात्री लाल रंगाने आकाश भरलं होतं. खरंतर हे असं काही घडणं म्हणजे ना जादू, ना चमत्कार ना कुठल्या वाईट गोष्टीचं चिन्ह. आकाशात लालभडक प्रकाश पसरणे ही घटना विचित्र वाटत असली तरी ती घडण्यामागे विशिष्ट भौगोलिक कारण आहे.
आकाशात लाल -हिरवा रंग आला कसा?

Image: yeelight
बल्गेरियाच्या आकाशात लाल रंग आणि स्लोव्हाकिया देशाच्या आकाशात हिरवा रंग पसरला. ही अदभूत वाटणारी घटना घडली ती सौर वादळातले कण जे सूर्यापासून तयार होतात ते कण कोट्यावधी मैलांचा प्रवास करुन पृथ्वीवर पोहोचतात. हे कण पृथ्वीवर पोहोचले की पृथ्वीचे चुंबकीय क्ष्रेत्र या कणांना ध्रुवीय भागांकडे नेतात.
ध्रुवीय प्रकाशात लाल आणि हिरवा रंग दिसतो त्याचं कारण म्हणजे सौर वादळातील कण जेव्हा पृथ्वीवर येतात. तेव्हा त्यांच्याशी आंर्तक्रिया करणारे तेव्हाच्या वातावरणाताल्या विशिष्ट वायूचे रेणू कारणीभूत असतात. वातावरणातल्या वायुंच्या रेणुंशी या कणांची आंर्तक्रिया होते. वातावरणातल्या ऑक्सिजनशी या कणांची आंर्तक्रिया झाल्यास हिरवा प्रकाश पडतो आणि वातावरणातल्या नायट्रोजनशी आंर्तक्रिया झाल्यास आकाश लाल रंगाने चमकतं. बल्गेरियाचं आकाश पहाटे लाल रंगाने भरलं ते या विशिष्ट कारणांमुळे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact