घरात खेळताना मोठ्यांचा ओरडा टाळायचा असेल तर?

मी काय करु?
- गौरी पटवर्धन

Image: freepik

मोठ्या माणसांनी आपल्याला सारखं रागवायला नको असं वाटत असेल तर सगळ्यात आधी काय करायचं? तर आपला आवाज हळू करायचा. काय होतं, तुम्ही एकमेकांशी खेळतांना एक्साईट होता. काही वेळा तुमची भांडणं होतात. काही वेळा तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना चांगलं खेळण्यासाठी प्रोत्साहन देत असता. पण हे सगळं करतांना तुम्ही भयंकर मोठ्या आवाजात बोलत असता. एरवीही तुम्ही तसेच बोलता. पण एरवी तुम्ही दिवसभर??? शाळेत जाता, कुठल्या क्लासला जाता आणि एकूणच असं खेळायला तुम्हाला रोज फारसा वेळ नसतो. त्यामुळे दिवसातले एखाद दोन तास तुमचा आवाज मोठी माणसं सहन करू शकतात. पण दिवसभर??? शक्यच नाही. त्यांचं डोकंच दुखायला लागतं. त्यांना एकमेकांशी मोठ्याने बोलावं लागतं. टीव्ही बघत असतील तर त्याचा आवाज वाढवावा लागतो. तसं केलं की तुम्ही त्याच्याहून मोठ्या आवाजात बोलता आणि शेवटी कोणाचातरी पेशन्स संपतो आणि तुम्ही बोलणी खाता.

हेही वाचा!

घरातल्यांना मुलांच्या खेळण्याचा त्रास होतो की मोठ्याने आवाज करण्याचा?

यात अजून एक भर म्हणजे तुम्ही ना, खेळण्याच्या नादात भयानक आवाजात किंचाळता. म्हणजे तुम्हाला ते लक्षात येत नाही, पण लांबून ऐकणाऱ्याला असं वाटतं, की कोणीतरी पडलं आहे, कोणाला तरी लागलं आहे, कोणीतरी किंचाळतं आहे. असं काही वेळा झालं की मोठ्यांना असं वाटायला लागतं, की त्यांनी हातातलं सगळं काम सोडून तुमच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. पण ते शक्य नसतं. कारण तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, तुमच्या आईवडिलांना नाहीत. त्यामुळे असे आवाज ऐकून त्यांची चिडचिड होते आणि मग… पुन्हा तेच! तुम्ही ओरडा खाता. त्यावर इलाज एकच आवाज हळू ठेवायचा.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact