मध्यरात्री कुठे सूर्य दिसतो का? निसर्गातली ही जादू कुठे घडते, कशी घडते?

आपल्या दिवसाचं एक चक्र असतं. सूर्य उगवतो. सकाळ होते. जसजशी दुपार होते सूर्य प्रखर होतो. संध्याकाळ जशी जवळ येवू लागते तशी सूर्याची प्रखरता कमी होते. सूर्य हळूहळू अस्ताला जातो. संध्याकाळ होते, मग रात्र. दिवस उगवला की आपण आपल्या कामाला लागतो. दिवस मावळेपर्यंत काम करत राहातो. पण दिवस मावळला की कामाची लगबग कमी होते. जेवण, आराम आणि मग झोपणं अशी कामं आपण रात्री करतो. मग हे ठरलेलं चक्र असेल तर मध्यरात्री सूर्य कसा दिसेल? आणि असं काही खरंच घडतं का?

- तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो असं घडतं. मध्यरात्रीचा सूर्य ही काही कल्पना नाही. हे वास्तव आहे. अदभूत वाटणारी बाब असली तरी हे नैसर्गिक आश्चर्य आपल्या पृथ्वीवर घडतं. मध्यरात्री जसा सूर्य ( मिडनाइट सन) दिसतो तसाच धुव्रीय रात्री ( पोलर नाइट्स) देखील आहेत. 

मध्यरात्री सूर्य .. कसा आणि कुठे?

पृथ्वी आपल्या कक्षात अशा पध्दतीने फिरते की आपल्याला 24 तासाच्या दिवसात दिवस आणि रात्रीचा अनुभव घेता येतो. पण जगात अशा जागा आहेत जिथे दिवस संपला तरी सूर्य मावळत नाही. तसेच काही काळ सूर्य उगवत सुध्दा नाही. मध्यरात्रीचा सूर्य म्हणजेच मध्यरात्र झाली तरी क्षितिजावरचा सूर्य मावळलेला नसतो. हे पृथ्वीवरचं चमत्कारिक नैसर्गिक आश्चर्य आर्क्टिक आणि अण्टार्क्टिक प्रदेशात घडतं. 

 Image: freepik

हे वाचा!

 Image: freepik

आर्क्टिक प्रदेशात उन्हाळ्याच्या काळात सूर्य मावळत नाही. त्याच काळात अण्टार्क्टिक प्रदेशात ध्रुवीय रात्री असतात. म्हणजे जिथे दिवसभर सूर्यच उगवत नाही. अण्टार्क्टिक प्रदेशात हिवाळ्यात सूर्य मावळत नाही. आर्क्टिक प्रदेशातील नाॅर्वे, फिनलंड, आइसलॅण्ड, स्वीडन, कॅनडा येथे मध्यरात्रीचा सूर्य दिसतो. तर ध्रुवीय रात्री या मानवी वस्ती नसलेल्या अण्टार्क्टिक प्रदेशात असतात.

पृथ्वी आपल्या कक्षेत फिरण्यासाठी २४ तास घेते. पृथ्वीचा अक्ष सूर्याकडे २३.५ डिग्रीने कललेला असतो. पृथ्वीचा अक्ष जर लंबाकार असता तर जगभरात सर्वत्र १२ तास दिवस आणि १२ तास रात्र राहिली असते. . आर्क्टिक प्रदेशात उन्हाळ्यात पृथ्वीचा अक्ष हा सूर्याकडे जा कललेला असतो , त्यामुळे येथील प्रदेशात ६ महिने सूर्य मावळत नाही. मध्यरात्रीही सूर्य क्षितिजावर तळपत असतो. कुठे तो ऊबदार असतो, तर कुठे प्रखर. हे वाचून मध्यरात्री सूर्य असतो यावर आता तुमचा नक्की विश्वास बसला असेल… हो ना? 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact