सुटीतल्या कंटाळवाण्या दुपारी करा आवराआवरीची इंटरेस्टिंग गोष्ट

मी काय करु?

 - गौरी पटवर्धन

Image: freepik

उन्हाळ्याच्या सुट्टीचे फायदे खूप असतात हे खरंय, पण त्याचे काही तोटेही असतात. त्यातला सगळ्यात मोठा तोटा म्हणजे सगळी दुपार मोठी माणसं लहान मुलांना घरात बसवून ठेवतात. “बाहेर ऊन आहे, काय हवं ते घरात खेळा.”हे वाक्य मुलांना ऐकवतात खरे, पण घरात काय हवं ते खेळू देतील असं अजिबात नसतं. म्हणजे, मुलांची कितीही इच्छा असली तरी घरात फुटबॉल, कॅच कॅच, क्रिकेट असलं कोणी खेळू देत नाही. किंवा अगदी पत्ते, कॅरम, ल्युडो, उनो असले बैठे खेळ खेळतांना पण आरडाओरडा करू देत नाहीत. आणि मग हळू हळू सुट्टी आपल्याला बोअर व्हायला लागते. मग आपण घरातल्या मोठ्या माणसांना विचारायला जातो की “आता मी काय करू?” तर त्यावरही ते काही चांगलं उत्तर देत नाहीत. मग अशा कंटाळवाण्या दुपारी करायचं तरी काय?

तर दुपार चांगली घालवण्यासाठी एक इंटरेस्टिंग आयडिया आहे. त्याला आईबाबा “तुमचं सामान / खोली / कप्पा आवरणं” असं म्हणतात. पण खरं तर त्यात अजून काही गोष्टी करण्यासारख्या असतात. म्हणजे, आपण जेव्हा कप्पा / खोली आवरतो तेव्हा आपण काय करतो? खरं खरं सांगा बरं…

तर आपण फक्त वस्तू लपवतो. हो की नाही? म्हणजे सगळी पुस्तकं एकावर एक ठेऊन कोपऱ्यात ढकलून देतो. सगळ्या लहान वस्तू एखाद्या खोक्यात भरून टाकतो. सगळी पेनं पेन्सिली एकत्र करून ठेवतो वगैरे वगैरे… पण चारच दिवसात या सगळ्या वस्तू परत पसरतात. हे असं का होतं?

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact