हवामान बदलास ग्रीन हाऊस गॅसेसचं वाढलेलं प्रमाण कारणीभूत ठरत आहे, हे आता संशोधनातून सिध्द झालं आहे. कोणत्याही गोष्टीचा जेव्हा वैज्ञानिक पध्दतीने विचार केला जातो, तेव्हा फक्त समस्यांवरच चर्चा होते असं नाही, तर समस्या कमी करणाऱ्या उपायांबद्दलही बोललं जातं. त्यामुळे पृथ्वी भोवतालच्या वातवावरणात ग्रीन हाऊस इफेक्ट वाढला आहे, हे जसं सत्य आहे, तसंच हा इफेक्ट कमी करणारे उपायही आहेत, जे माणसाच्या हातात आहे. ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जन कमी करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर, सामुहिक पातळीवर. देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करावे लागतील. ग्रीन हाऊस गॅसेसचं वाढणारं प्रमाण रोखण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे हवेत हे वायू जास्त प्रमाणात मिसळणार नाही यासाठी प्रयत्न करणे आणि दुसरा मार्ग म्हणजे वातावरणातले/ हवेतले हे वाढलेले वायू बाहेर काढण्यासाठी पृथ्वीची क्षमता वाढवणे.
वातावरणातले ग्रीन हाऊस गॅसेसचं वाढलेलं प्रमाण कमी करण्यासाठीच्या उपायांची अंमलबजावणी जगभरात सुरु झाली आहे. पण त्याचं प्रमाण कमी आहे. काहीजण वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करत आहेत, काही जण सामुहिकपणे उपाय योजत आहेत तर काही देशांनी यासाठीचं एक धोरण ठरवून ते अमलात आणण्याचं काम सुरु केलं आहे.
हेही वाचा!
माणूस काय करू शकतो ?

Image: indiacsr.in

Image: undp.org
वातावरणात वाढलेला ग्रीन हाऊस इफेक्ट कमी करण्यासाठी माणूस काहीच करू शकत नाही असं मुळीच नाही. माणसाने आपल्या जगण्याच्या पध्द्तीकडे लक्ष द्यायला हवं. आपली जीवनशैली पर्यावरणास हानिकारक न ठेवता पर्यावरणसुलभ ठेवल्यास, वातावरणातला ग्रीन हाऊस इफेक्ट कमी करण्यासाठी आपण आपला प्रयत्नानांचा वाटा नक्कीच उचलू शकतो. वर सांगितलेले उपाय आपल्याला यासाठी नक्कीच मदत करू शकतील!
काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! -कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact