एक झाड कापलं तर असं काय नुकसान होतं?

पृथ्वीला ताप का आला?

- विनय र.र (मराठी विज्ञान प्रसारक)

Image: freepik

तुम्ही कधी विचार केलाय का, एक झाड कापलं तर आपल्या हवेची किती हानी होते ते! झाड हे फक्त सावली देत नाही, फुले-फळे देत नाही तर आपल्या हवेतून हानिकारक वायूही शोषून घेतं. त्यामुळे झाड कापणं म्हणजे पर्यावरणाला मोठा धक्का बसतो.
झाड कसं काम करतं?
* झाड आपल्या पानांद्वारे प्रकाशसंश्लेषण (फोटोसिंथेसिस) नावाची प्रक्रिया करतं. यात झाड हवेतून कार्बन डायऑक्साइड (CO₂) घेतं, पाणी आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीनं त्याचा उपयोग करून स्वतःसाठी अन्न बनवतं. या प्रक्रियेत ऑक्सिजन सोडला जातो. तो आपण श्वासावाटे शरीरात घेतो. म्हणजे झाड CO₂ शोषून घेऊन हवा स्वच्छ करतं.
* एक मोठं झाड २० ते ४० वर्षांचं, दरवर्षी साधारण २० ते २५ किलो काबर्न डाय ऑक्साइड शोषून घेतं. काही झाडं तर ४०-५० किलो पर्यंत शोषतात! म्हणजे एक झाड आपल्या कारखान्याच्या, गाड्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा थोडा भाग नक्कीच कमी करतं.
एक झाड कापलं की काय होतं?

हेही वाचा!

शहरं उष्ण का असतात. शहरातल्या रस्त्यांना कोण 'हाॅट' बनवतं?

 

 

Image: freepik

जेव्हा झाड कापलं जातं तेव्हा..

जेव्हा झाड कापलं जातं तेव्हा दोन गोष्टी होतात:
१. झाड आता कार्बन डाय ऑक्साइड शोषणं थांबवतं. म्हणजे दरवर्षीचे २०-२५ किलो कार्बन डाय ऑक्साइड हवेत राहतात.
२. झाडात साठवलेलं कार्बन परत हवेत सोडला जाऊ शकतो.
झाड कापल्यानंतर जर ते जाळलं किंवा कुजलं तर त्यात साठवलेलं कार्बन डायऑक्साइड मध्ये बदलतो.
एक सरासरी मोठं झाड आपल्या आयुष्यात ५०० ते १००० किलो कार्बन डाय ऑक्साइड शोषून साठवतं. म्हणजे एक झाड कापलं आणि जर ते जळलं किंवा पूर्ण कुजलं तर हवेत सुमारे ५०० ते १००० किलो कार्बन डाय ऑक्साइड जास्त वाढू शकतो! एक सामान्य माणूस वर्षाला सुमारे १-२ टन कार्बन डाय ऑक्साइड गाडी, विजेचा वापर, अन्न याद्वारे सोडतो. म्हणजे एक झाड कापणं म्हणजे १-२ वर्षांच्या एखाद्या व्यक्तीच्या कार्बन डाय ऑक्साइड सोडण्याइतकं नुकसान होतं.
पण सगळं झाड कापलं तरी ताबडतोब इतका कार्बन डाय ऑक्साइड सोडत नाही. जर लाकूड फर्निचर, घर बांधण्यासाठी वापरलं तर कार्बन अजूनही आत साठलेला राहतो. पण जास्त झाडं कापली तर जंगल कमी होतं आणि हवेत कार्बन डाय ऑक्साइड वेगानं वाढतो.
म्हणूनच आपण झाडं कापू नये, उलट जास्तीत जास्त झाडं लावावीत.
एक झाड लावलं तर आपण हवेची स्वच्छता करतो आणि भविष्यातील पृथ्वीला थंड ठेवतो.
शेवटी - एक झाड हे छोटंसं वाटतं, पण ते हवेच्या गुणवत्तेसाठी खूप मोठं आहे.म्हणून प्रत्येकाने झाडं वाचवूया आणि नवीन झाडं लावूया!

vinay.ramaraghunath@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact