व्हॅटिकन सिटी शहर कुठलं हा तर आहे जगातला सर्वात लहान देश!

Image: .thevaticantickets

एक संपूर्ण देश फिरायचा म्हटला तर अनेक महिने लागतात. पण आपल्या पृथ्वीवर असाही एक देश आहे जो फिरायचा म्हटला तर फक्त ४ ते ५ तास लागतील.खोटं वाटतंय का तुम्हाला? मग तुम्हाला व्हॅटिकन सिटीबद्दल सांगायलाच हवं.

व्हॅटिकन सिटी जगातला सर्वात लहान देश म्हणून ओळखला जातो. स्वतंत्र राष्ट्र राज्य असलेल्या व्हॅटिकन सिटी या शहराची लोकसंख्या १००० पेक्षाही कमी आहे. ११०एकर परिसरात व्हॅटिकन सिटी हा देश वसलेला आहे. जगातला सर्वात लहान देश असला तरी या देशात अनेक गोष्टी अशा आहेत ज्यासाठी जगात या छोट्याशा देशाला खूप महत्व आहे. भौगोलिकदृष्ट्या हा देश इटलीमध्ये असला तरी या देशाची स्वतंत्र कायदा आणि राजकीय व्यवस्था आहे.

हेही वाचा!

छोट्या देशातल्या मोठ्या गोष्टी  

आपण परदेशात फिरायला जातो तेव्हा आपल्या पासपोर्टवर त्या देशाचा शिक्का मारला जातो. पण व्हॅटिकन सिटी या देशात फिरायला गेल्यावर आपल्या पासपोर्टवर या देशाचा शिक्का मारला जात नाही.

या देशात जन्माला न येणारेही या देशाचे नागरिक म्हणून ओळखले जातात. याचं कारण म्हणजे या देशात दवाखाच नाही. त्यामुळे येथे कोणी जन्मालाच येत नही. जन्माला न येताही व्हॅटिकन सिटीचं नागरिकत्व मिळतं ते या देशात येवून काम केल्याने, नोकरी केल्याने.

व्हॅटिकन सिटीमध्ये असलेलं पोस्ट ऑफिस ही जगातलं उत्कृष्ट पोस्ट ऑफिस म्हणून ओळखलं जातं. इंटरनेट, मोबाइलच्या काळातही येथील लोकांना हातानं पत्र लिहायला आवडतं. दर आठवड्याला पोस्टात येवून लोवून लोकं पोस्टाने पत्र पाठवतात. रोमन लोकंही इटलीमधील पोस्ट सेवेवर अवलंबून न राहाता व्हॅटिकन सिटीच्या पोस्ट ऑफिसच्या सेवांचा लाभ घेतात.

 Image: nemo.guide

हेही वाचा!

व्हॅटिकन सिटीधील रेल्वेसेवा जगातली सर्वात अरुंद ( लहान) मार्गाची रेल्वे म्हणून ओळखली जाते. व्हॅटिकन सिटीचा रेल्वे ट्रॅक केवळ ३०० मीटर इतक्याच लांबीचा आहे.  सिटा व्हॅटिकॅनो नावाचं एकमेव रेल्वेस्टेशन व्हॅटिकन सिटीत  आहे. रेल्वेचा उपयोग प्रामुख्याने माल वाहतुकीसाठी होतो. महत्त्वाची बाब म्हणजे व्हॅटिकन सिटीमध्ये नियमितपणे रेल्वेने प्रवास करणारे प्रवासीच नाहीत.

Image: thetimes

व्हॅटिकन  सिटी हा देश लहान असला तरी पर्यटकांच्या बाबतीत हा देश जगात पुढे आहे. जगाच्या तुलनेत लोकसंख्येच्या बाबातीत अगदीच लहान देश असला तरी या छोट्या देशात जगभरातून पर्यटक येतात. व्हॅटिकनमधील व्हॅटिकन म्युझियम हे प्रसिध्द संग्रहालय आहे. या म्युझियममध्ये असंख्य दालनं असून सर्व दालनात मिळून  ७०,००० कला वस्तू आहेत. या म्युझियमला दर वर्षी ५० लाख पर्यटक भेट देतात.

व्हॅटिकन सिटीचा इतिहास इसपूर्व काळातला असला तरी एक स्वतंत्र देश म्हणून व्हॅटिकन सिटीला १९२९ मध्ये मान्यता मिळाली . आज हा देश ९३ वर्षांचा आहे. देश छोटा असला तरी जगभरात या देशाने आपल्या खास वैशिष्टयांनी नाव केलं आहे 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact