हॅलो, मी ऊर्जा!

तुम्हा सगळ्यांना हॅप्पी न्यू इअर!
या नवीन वर्षात तुम्हा सगळ्यांसाठी एक गुडन्यूज आहे...
तुम्ही सगळेच इथे वेबसाईटवर मला नियमित भेटायला येता, ते मला आवडतंच.
पण आजपासून दर रविवारी 'दैनिक लोकमत' च्या अंकात मीच तुम्हाला भेटायला येणार आहे.
माझ्या वेबसाईटवर असतात तसेच भरपूर लेख, नवनवीन माहिती, सिक्रेट्स आणि मनमोकळ्या गप्पा अशी सगळी धम्माल आता दर रविवारी 'दैनिक लोकमत' मध्येही करुया...
त्यासाठी काय करायचं? दर रविवारी एक तर 'दैनिक लोकमत' चा अंक बघायचा... किंवा सरळ दैनिक लोकमत वर जाऊन ईपेपर वाचायचा.
आहे की नाही सोप्पं? तर मग भेटूया आणि गप्पा मारत राहुया तिकडेही!


