झाडांमुळे आपले कान सुरक्षित राहतात! म्हणजे नक्की झाडं काय करतात?

Image: hatkosoundbarrier

आपल्या कानावर दिवसभर निरनिराळे आवाज आदळत असतात. काही आवाज आपल्या कानांना सहन होतात, तर काही आवाजामुळे कान दुखतात, डोकं दुखतं. आपली रोजची काम करण्यात हे आवाज अडथळे आणतात. पण आपल्या आजूबाजूला झाडं आहेत म्हणून तरी बरं.. नाहीतर आपल्या कानांचं काय झालं असतं? कारण झाडांमुळे आजूबाजूचा आवाज त्याच्या मूळ तीव्रतेने आपल्या कानावर आदळत नाही. झाडं हे ध्वनीचं प्रदूषण कमी करुन आपले कान सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे झाडं केवळ, सावली, फळं, पाऊस यासाठीच महत्त्वाची असतात असं नाही तर झाडांमुळे ध्वनीचं प्रदूषणही कमी होतं. १०० फूट पसरलेलं झाड ५ ते ६ डेसिबलपर्यंत आवाज कमी करतं. आपल्या आजूबाजूला कोणत्या प्रकारची झाडं, वनस्पती आहेत त्यावर आपल्याला येणाऱ्या आवाजाची तीव्रता अवलंबून असते.

हेही वाचा! 

झाडांमुळे ध्वनीप्रदूषण कसं कमी होतं?

एकाच तीव्रतेचा आवाज जर आपल्याला सतत ऐकावा लागला तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो. पण झाडांमुळे आवाज बऱ्यापैकी सौम्य होवून आपल्या कानावर पडतात. त्यामुळे आपल्या कानांना इजा होत नाही.  

झाडांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे झाडं आवाजाची तीव्रता कमी करु शकतात. झाडाचे मूळ, खोड, फांद्या, पानं, फुलं, फळं, झाडाची साल हे विविध घटक असतात. हे घटक आवाजाची तीव्रता घटवण्याचं काम करतात.  झाडंमुळे  ध्वनी प्रदूषणामुळे पर्यावरणाचं होणारं नुकसानही काही प्रमाणात कमी होतं.

झाडं आवाजामध्ये, ध्वनी लहरींमध्ये अडथळा निर्माण करतात. झाडाचे विविध भाग ध्वनीची दिशा बदलण्याचे, ध्वनीचं विभाजन करण्याचे काम करतात. तसेच  झाडांमध्ये इतर बाहेरचे आवाज झाकण्याची क्षमताही असते.

इतर वस्तुंनी ध्वनीमधील ऊर्जा जर शोषून घेतली तर ध्वनीची तीव्रता नाहीशी होते. त्यामुळे आवाज येत नाही आला तरी त्याची तीव्रता फारच कमी असते..

झाडाची रचना, झाडाची उंची, झाडाच्या फांद्यांची रचना, पानांचा आकार, झाडाची घनता , सालाचा पोत (टेक्श्चर) , झाडाच्या लाकडाची घनता यामुळे ध्वनी शोषला जातो आणि सहन होईल इतपत आवाज कमी होतो. पाइन, फर सारखे सदाहरित वृक्ष पानगळ होणाऱ्या झाडांपेक्षा जास्त आवाज शोषतात.

आवाजाची तीव्रता ही बहुतेककरुन झाडाच्या मुळाशी शोषली जाते. झाडाची मुळं माती सैल करतात. डेरेदार वृक्षांच्या सावलीमुळे झाडांच्या मुळाकडली माती मऊ राहाते. झाडाच्या मुळाशी स्पंजसारखं आवरण तयार होतं. झाडाचा मुळाकडील भाग मऊ होतो आणि त्यात ध्वनी शोषला जतो.

 Image: mowingmagic

हेही वाचा! 

Image: folkestone

तीव्र ध्वनीचे विस्थापन करण्यात त्यांची दिशा बदलण्यात झाडाच्या खोडाचा खूप फायदा होतो. झाडावरच्या खडबडीत सालामुळे आवाजाच्या लहरी पुन्हा त्या आवाजाच्या मूळ स्त्रोताकडे जात नाही. झाडाच्या खोडामुळे आवाजाची तीव्रता कमी होते, ध्वनी लहरी दिशा बदलतात. झाडांची पानं, खोल, साल हे एकत्रित परिणाम करुन आवाज ऐकू येईनासा करु शकतात.

झाडांमुळे आवाजाचे विभाजन होते. त्याची दिशा बदलते. झाडाच्या पानाचा पोत , झाडाच्या फांद्या, साल हे एकत्रित परिणाम करुन आवाजाची तीव्रता कमी होते.

झाडांमुळे अडथळा वाटणारा आवाज झाकलाही जातो. प्रत्येक झाडामध्ये वैशिष्ट्यपूर्ण आवाज निर्मा करण्याची क्षमता असते. झाडांच्या पानांचा सळसळ होणाऱ्या आवाजाने निसर्गात एक झाडांचा म्हणून आवाज तयार होतो. या आवाजाने इतर अनावश्यक, त्रासदायक आवाज दाबला जातो आणि कानांवर झाडांचा हवाहवासा आवाज पडतो. झाडांच्या आवाजामुळे इतर कुठले आवाज ऐकू येईनासे होतात. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact