अवाढव्य हिमखंड जागचा हलला आणि वाहू लागला. आता काय होणार?

Image: ts2.space

निसर्गात अशा काही घटना घडतात ज्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटतं. अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. जगातला सर्वात मोठा हिमखंड ३० वर्षांमध्ये पहिल्यांदा आपल्या जागेवरुन हलला आणि त्याची बातमी झाली. या हिमखंडाचा आकार पाहिला तर मग तो जागेवरुन हलल्याची चर्चा जगभर का होते आहे, याचं कारण समजेल. हा हिमखंड किती मोठा तर ४,००० (चार हजार) स्क्वेअर किलोमीटर म्हणजे १,५०० स्क्वेअर माइल्स एवढा प्रचंड. अंटार्क्टिक समुद्रातील या हिमखंडाचं नाव A23a असून सोप्या समजेल अशा भाषेत या हिमखंडाचा आकार सांगायचा झाला तर A23a हा हिमखंड अमेरिकेतील न्यूर्याक शहराच्या तिप्पट आकाराचा आहे.

हेही वाचा!

१९८६ मध्ये पश्चिम अंटार्क्टिकाच्या फ्लिचर-राॅने या हिमतटापासून वेगळा झालेला हा हिमखंड त्यापूर्वी सोव्हिएत रिसर्च स्टेशनचा भाग होता. तो दक्षिण महासागरातल्या वेडेल समुद्रात अडकून राहिला होता. तेव्हापासून तिथेच असलेल्या या A23a हिमखंडाचे सॅटेलाइटद्वारे जे फोटोज मिळालेत त्यावरुन ट्रिलिअन मेट्रिक टन वजनाचा हिमखंड महाकाय अंटार्क्टिक द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील टोकावरुन जोरदार वारे आणि समुद्रातील वेगवान प्रवाहामुळे वाहत आहे.

एवढा अवाढव्य हिमखंड जागचा हलणे ,वाहणे ही दुर्मिळ घटना असल्याचं ब्रिटीश अंटार्क्टिक सर्वेक्षणाचे हिमनद्या तज्ज्ञ ऑलिव्ह मार्श यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच शास्त्रज्ञ या हिमखंडाच्या प्रवाहाच्या मार्गाचे बारकाईने निरीक्षण करत आहेत. हिमखंड जसजशी समुद्राची वाफ मिळवेल तसं ते अंटार्क्टिक समुद्राच्या वर्तुळाकार प्रवाहात प्रक्षेपित होईल आणि दक्षिण महासागराच्या हिमखंडाच्या गल्लीकडे वाहात जाईल. या हिमखंडाच्या गल्लीत आधी वाहून आलेले इतरही हिमखंड आहेत. A23a हा हिमखंडही त्या हिमखंडाच्या गल्लीकडे का चालला आहे याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत.

Image: interestingengineering

काळाप्रमाणे हा हिमखंड आपल्या मूळ आकारापेक्षा थोडा बारीक झाल्याने तो समुद्राच्या जमिनीपासून उसळला आणि सागराच्या प्रवाहामुळे आणि वाऱ्याच्या गतीमुळे तो पुढे वाहू लागला.A23a ह हिमखंड जगातला सर्वात जुना हिमखंड म्हणूनही ओळखला जातो. शक्यता अशी आहे की हा हिमखंड वहात जावून तो दक्षिण जाॅर्जिया बेटावर अडवला जाईल. त्यामुळे अंटार्क्टिकाच्या वन्यजीवनावर त्याचा गंभीर परिणाम होईल. कोट्यावधी मासे, पेंग्विन, समुद्र पक्षी हे या बेटावर प्रजनन करतात. तिथेच चारा पाणी शोधतात. पण A23a या हिमखंडामुळे हा मार्ग या जीवांसाठी बंद होण्याची शक्यता आहे.

२०२० मध्ये A68 हा असाच एक महागाय हिमखंड हा दक्षिण जाॅर्जिया समुद्रात धडकेल आणि तेथील समुद्री जीवन उध्वस्त करेल अशी शंका होती. पण ही आपत्ती येण्याची टळली. कारण या हिमखंडाचे छोटे छोटे तुकडे झाले. आणि A68 या हिमखंडाचा पुढचा धोका टळला. पण A23a हा हिमखंड मात्र आकाराने इतका मोठा आहे की त्याचे तुकडे होणे संभव नाही. तो दक्षिण महासागरात बराच काळ टिकून राहण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. पण दक्षिण महासागराचं तापमान जास्त असल्याने हा हिमखंड पुढे दक्षिण आफ्रिकेपर्यंत वाहून जाईल आणि तेथील जहाजांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण करेल अशी शक्यता या A23a हिमखंडाबाबत वर्तवली जात आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact