
साहित्य :२५० मिली दूध, वेगवेगळया उंचीची आणि व्यासाची पातेली.
कृती : लक्ष नसले कि दूध उतू जाते. तुम्हाला निरीक्षण करायचं आहे की दूध गरम करताना काय घडते?
दुधावर प्रथम सायीचा थर तयार होतो व तो काही वेळाने फुगून वर यायला लागतो. नंतर तो थर भांडयाच्या बाहेर पडतो म्हणजेच दूध उतू जाते. दूध तापवले तरी उतू जाणार नाही असे पातेले आपल्याला शोधून काढायचे आहे.
२०० मिली दूध २००मिलीच्या पातेल्यात गरम केले तर ते उकळायला लागण्यापूर्वीच उतू जाणार. त्यासाठी दुधाच्या सव्वा पट २५० मिलीचे पातेले घ्या. त्यात दूध तापवायला ठेवा. उतू जाते का?
हेही वाचा!
फुलझाडं लावा आणि पाण्यातलं प्रदूषण कमी करा..

उतू जात असेल तर दिडपट म्हणजे ३०० मिली आकारमानाचे पातेले घेऊन प्रयोग करा. मग पावणेदोन पट ३५० मिली, दोन पट ४००मिली, सव्वा दोन पट ४५०मिली अशी पातेली घेऊन प्रयोग करा. किती पट मोठ्या आकारमानाच्या पातेल्यात कितीही उकळले तरी दूध उतू जात नाही? याचा शोध घ्यायचा आहे.
मग त्याच आकारमानाची पण विविध व्यास असणारी पातेली घेऊन हाच प्रयोग करा. पातेल्याची उंची आणि त्यातल्या दुधाची पातळी कोणत्या प्रमाणात असली तर दूध उतू जात नाही? हे शोधून पाहा...
- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


