घाबरत उडणारा पण सुसाट पळणारा रोडरनर हा पक्षीच आहे ना?

Image: allaboutbirds

घाबरत उडणारा पण सुसाट पळणारा रोडरनर.. हा नक्की पक्षीच आहे ना?

पक्षी कुठे रस्त्यावर चालतात का? पण रोडरनर हा पक्षी तसाच आहे. त्याच्या या विचित्र सवयीमुळेच अमेरिकेत विशिष्ट ठिकाणी आढळणारा हा रोडरनर अख्या जगाला माहित आहे.

पक्षी म्हटलं तर तो आकाशात उंच उडणारच. पण रोडरनर हा पक्षी मात्र इतर पक्ष्यांसारखा नाही. उडायला घाबरणारा पण रस्त्यावर सुसाट धावणारा रोडरनर आपल्याला भेटतो तो दक्षिण आणि मध्य अमेरिकेत. पण रोडरनरच्या काही वैशिष्ट्यांमुळे हा पक्षी जगभरात प्रसिध्द आहे. रोडरनर म्हणजे मजेदार आणि विचित्र पक्षी. त्याची लांब शेपटी, चपळ पाय,डोक्यावरचा रंगीत तुरा आणि उत्सुकतेने आजूबाजूला पाहणारा रोडरनर हा कुकुलिडे किंवा कुकू या पक्ष्यांच्या कुळातला. म्हणजे आपले कावळा, कोकिळा हे पक्षी ज्या कुटुंबातले त्याच कुटुंबातला हा रोडरनर पक्षी आहे.

हेही वाचा! 

रोडरनर दिसतो कसा? वागतो कसा?

रोडरनर जर धुळभरल्या रस्त्यावरुन चालला तर त्याच्या पायाचे X आकारातले ठसे उमटतात. कारण त्याच्या पायाला दोन बोटं पुढे आणि मागच्या पायाला दोन बोटं मागच्या दिशेने असतात.रोडरनर म्हणजे सहज दृष्टीस पडणारा पक्षी आहे. पण त्याचा आवाज इतका सहज आणि वारंवार ऐकायला येत नाही. अर्थात या पक्ष्याला वेगवेगळे आवाज काढता येतात. पण तो कमी बोलणारा पण जास्त दिसणारा असा पक्षी आहे.

रोडरनर म्हणजे सहज दृष्टीस पडणारा पक्षी आहे. पण त्याचा आवाज इतका सहज आणि वारंवार ऐकायला येत नाही. अर्थात या पक्ष्याला वेगवेगळे आवाज काढता येतात. पण तो कमी बोलणारा पण जास्त दिसणारा असा पक्षी आहे.

पक्षी असूनही रोडरनर उडण्याच्या बाबतीत मात्र अगदीच कच्चा लिंबू आहे.  रोडरनरला उडता येतं, पण ते जवळच्या जवळ / तिथल्या तिथे उडतात. फार लांबवर उडत जात नाही. जमिनीवर वावरणारा अशी रोडरनरची मुख्य ओळख आहे. रोडरनर कुंपणावरुन,झाडांच्या फांद्यावरुन किंवा दगडांवरुन उडतात तेव्हा ते अडखळतात. उडण्यापेक्षा ते चालण्यालाच जास्त महत्त्व देतात.

Image: travisaudubon

रोडरनर एका तासात १५ मैल चालतात. ते पळत सुटले तर एका तासात २६ मैल अंतर सहज कापतात. कुकू कुटुंबातील पक्ष्यांमध्ये सर्वात वेगाने चालणारा पक्षी म्हणजे रोडरनर. पळताना दिशा बदलण्यासाठी, शरीराचा समतोल साधण्यासाठी ते आपल्या लांब शेपटीचा उपयोग करतात.

कोरड्या, ओसाड जागी, मोकळ्या रानात किंवा शेताच्या आसपास रोडरनर राहातात. उंदीर, सरपटणारे जीव. साप, किडे, छोटे पक्षी आणि त्यांची अंडी हे या रोडरनरचं खाणं. हे पक्षी पाणी कमी पितात. त्यांची पाण्याची तहान त्यांच्या भक्ष्याच्या शरीरातील पाण्याने भागते.

समुद्र पक्ष्यांप्रमाणे या पक्ष्यांच्या डोळ्याच्या कडेला विशिष्ट ग्रंथी असतात. त्यातून खारट घटक त्यांच्या शरीरात स्त्रवतो. या घटकामुळे त्यांच्या शरीरातील रसायनांचा समतोल टिकून राहातो.

Image: bemidjipioneer

रोडरनरची मादी जोडीदार ही कायमस्वरुपी ठरलेली असते. नाचून, आवाज काढून, पाठलाग करुन, आपल्या वाटेचा खाऊ देवून ते मादी रोडरनरला आकर्षित करतात. या पक्ष्यांना जेव्हा अंडी घालायची असतात तेव्हा नर रोडरनर मादी रोडरनरला झाड्यांच्या काड्या, पानं, गवत, सापाची कातडी, शेणाचे तुकडे आणून देतात. या साहित्याच्या आधारे मादी रोडरनर अंडी टाकण्यासाठी घरटं तयार करते. अंड्यातून बाहेर आलेल्या पिल्लांना मात्र नर आणि मादी रोडरनर दोघे मिळून वाढवतात. हे रोडरनर ७ ते ८ वर्षं जगतात.

रस्त्यावर चालणारे म्हणून नाव पडलेले रोडरनर वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांवरुन चालू शकतात. ते राहातात त्या ठिकाणी कोणी घुसघोरी करु नये म्हणून फिरत फिरत लक्ष ठेवतात. गस्तच घालतात म्हणा ना. गल्ली-बोळा, नदीच्या सुकलेल्या प्रवाहातून ते फिरत राहातात.

हेही वाचा! 

वाळवंटात जेव्हा रात्री खूप थंडी पडते तेव्हा हे रोडरनर एका जागी बसून घेतात, स्वत:ची जास्त ऊर्जा खर्च करत नाही. सकाळी मस्त उन्हाकडे शेपटी करुन बसतात. आपले पंख पसरतात, शरीरावरची पिसे उभी करुन त्वचेमध्ये ऊन शोषून घेतात आणि गरम राहाण्याचा प्रयत्न करतात.

रोडरनरचे ग्रेटर रोडरनर आणि लेसर रोडरनर असे दोन प्रकार आढळतात.  ग्रेटर रोडरन न्यू मेक्सिकोचा राज्य पक्षी आहे. या देशातील प्राचीन संस्कृतीत, तेथील आदिवासी, स्थानिक लोकांना रोडरनरबद्दल अतिशय आदेर आहे. ही लोकं रोडरनरला शुभ पक्षी मानतात. या रोडरनर बद्दल न्यू मेक्सिकोमध्ये अनेक लोककथा देखील आहेत. आपल्या विचित्र सवयींमुळे मजेदार वाटणारा हा पक्षी अमेरिकेत काही ठिकाणी मानाचा पक्षी देखील आहे.

कार्टूनमधला हसवणारा रोडरनर

रोडरनर या पक्ष्याचं नाव असं एकत्र लिहिलं जातं. पण या पक्ष्यावरचं कार्टून मात्र रोड रनर अशा  दोन शब्दांचं आहे. चक जोन्स यांनी १९४८ मध्ये वाॅर्नर बदर्स प्रोडक्शनसाठी रोड रनर हे कार्टून तयार केलं १९४९ मध्ये विली ए. कोयोटे या कार्टून मध्ये रोड रनरला मूर्ख पात्राचा रोल होता. कार्टून आणि चित्रपटातली ही रोड रनरची ओळख कायम राहिली.  नंतर अनेक कार्टून, चित्रकथा, जाहिराती, व्हिडीओ गेम्स  आणि हू फ्रेम्ड राॅजर रॅबिट आणि स्पेस जॅम या दोन चित्रपटातही हा रोड रनर पक्षी दाखवला गेला आहे.  त्यामुळे रस्त्यावर धावणारा हा रोडरनर तिकडे टीव्हीवरही खूप प्रसिध्द आहे.

Image: in.pinterest

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact