
आता तुमच्यापैकीच बघा, काही जणांचं गणित चांगलं असेल, काहींचं इंग्रजी तर काहींना अभ्याचं नको, फक्त खेळायला सांगा. त्यात ते एकदम पक्के असतात. आपल्या हातांचं; नुसत्या हातांचं कशाला, आपल्या प्रत्येक अवयवाचं असंच असतं. त्यांचा जितका उपयोग तुम्ही कराल, तेवढी त्यांची क्षमता वाढत जाते. त्यामुळे आपल्या प्रत्येक अवयवाला व्यायाम पाहिजे.
आज थोडा अवघड व्यायाम तुम्हाला शिकवते. दाखवाच करून! ज्यांना, ज्यांना अगदी पहिल्याच वेळेस आणि तेही एकदम सहजतेनं हा व्यायाम जमेल, त्या त्या प्रत्येकाला मी दोन-दोन चॉकलेट्स देईन!
हेही वाचा!
एका पायाचा व्यायाम पण तो दोन्ही पायांनी करायचा. तो कसा?
काय करायचं?
-

image : freepik सरळ उभे राहा. आपले दोन्ही पाय हळूहळू फाकवत चला. हां बरोब्बर. सर्कसमध्ये दाखवतात तस्सं किंवा जिम्नॅस्टिकची मुलं करतात तसं!
- लक्षात ठेवा, पाय जेवढे तुम्हाला फाकवता येतील, तेवढेच फाकवा. मांड्यांत, जांघेत कळ आली की लगेच थांबा. नाहीतर पाय, मांड्या इतक्या दुखतील, की दुसºया दिवशी तुम्हाला झोपूनच राहावं लागेल!
- या व्यायामाची घाई कधीच करायची नाही. रोज करत गेलात, तर हळूहळू तुमची लवचिकता नक्कीच वाढेल. इतकी, की तुम्ही दोन्ही पाय पूर्णपणे फाकवून त्यावर आरामात बसू शकाल आणि पुढे हात टेकून एखादी डुलकीही काढू शकाल. सोबतच्या चित्रात मी करतेय ना तस्सं!
है, कोई तय्यार?
है किसी में हिंमत?
- तो फिर कर के दिखाव!और ले जाव मेरे से चॉकलेट!
तुमचीच ‘फेकू’ मैत्रीण,
- ऊर्जा
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


