फुलं-पानं-दगडाची मांडामांड करा आणि चित्र काढा!

चला, चित्रं काढूया!
- आभा भागवत

Image: .k6art.com

अँडी गोल्ड्सवर्दी यांचं खास वैशिष्टय म्हणजे त्यांच्या कलाकृती कायमस्वरूपी नसतात. त्या काही वेळा काही तास किंवा काही दिवस टिकतात. आणि मग ऊन, पाऊस, वारा यांच्यामुळे बदलतात आणि नाहीशा होतात. म्हणजे कलाकृती तयार होण्याची प्रक्रिया त्यांना महत्वाची वाटते. या कलाकृती करत असताना निसर्गाचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही याचीही ते काळजी घेतात. यासाठी खूप संयमाने आणि खूप क्रिएटिव्ह विचार करावा लागतो. मग तयार आजच्या कलाकृती करायला?

घराजवळ टेकडी, नदी, मैदान, झाडी किंवा माळरानावर जाऊन एकसारख्या आकाराचे, रंगांचे दगड निवड. त्यातून एखादी रचना कर. आता एखाद्या झाडाखाली पडलेली फुलं, पानं, काड्या गोळा कर आणि त्यांना एकमेकांत गुंफून काही चित्र तयार करता येईल का बघ. आता तुझ्या घरी असणारे रंगीत खडू, स्केचपेनं असं रंगकामाचं साहित्य गोळा कर. ते मांडून एक सुंदर रचना करून बघ. आता आईची परवानगी घेऊन कणिक घे. जमिनीवर मोठा कागद पसर. त्यावर हे पीठ चाळणीने पसरून एकसारखं टाक. त्या पिठात बोटाने नागमोडी रेघा काढून चित्र काढता येतं का बघ.
अँडी गोल्ड्जवर्दींनी मोठ्या प्रमाणात असे उभारणी शिल्प-चित्रांचे प्रयोग केल्यानंतर जगभरातल्या अनेक कलाकारांनी प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखे आणि त्यातून सुचलेले वेगवेगळे असंख्य प्रयोग केले. इंटरनेटवर अँडी गोल्ड्सवर्दी यांच्या इतर कलाकृती, फिल्मस जमल्यास जरूर बघ. इतर कलाकारांच्याही अनेक मस्त मस्त कलाकृती बघायला मिळतील. त्यातून तुलाही बरंच काही सुचेल ते जरूर करून बघ.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact