कुंगफू केवळ मारामारी नव्हे. ड्रेला कुंगफूचा खरा अर्थ कळतो तेव्हा!

- शिल्पा दातार
त्याचं नाव ड्रे पार्कर. त्याच्या आईची अमेरिकेतून बदली होते ते थेट चीनमध्ये. अमेरिकन गोरा नाहीतर कृष्णवर्णीय असतो हा ड्रे. मायलेक दोघंच बिजिंगला राहायला येतात. भाषा येत नसते. साधं गिझर सुरु करायचं तर माणूस सापडणं मुश्किल. पण एक काका सापडतो प्लंबर. ड्रे शाळेत जायला लागतो तर तिथं मुलं त्याला चिडवायला, त्रास द्यायला लागतात.
त्याच्या वेगळ्या दिसण्यामुळे, तो नवीन असल्याने एक पंधरा वर्षांचा चेंग नावाचा मुलगा आणि त्याची गँग ड्रेला त्रास द्यायला लागतात. चेंग कुंगफू चँपियन असतो. ड्रे वैतागतो एकदा शाळेच्या फिल्ड व्हिजिटनंतर तर ड्रे चेंग आणि त्याच्या मित्रांवर घाण पाण्याची बादली फेकतो. ती संतापलेली मुलं त्याचा पाठलाग करतात. त्याला चांगलं चोपून काढतात.  त्याचवेळी मिस्टर हान म्हणजे ड्रे च्या घरी आलेला प्लंबरच नेमका तिथं येतो आणि ड्रे ला वाचवतो.
तेव्हाच ड्रे ठरवतो की आपणही कुंग फू शिकायचं.
चेंग आणि त्याचे मित्र ली नावाच्या गुरुकडे कुंगफूचे धडे घेत असतात. मात्र ते ड्रेला कुंग फू शिकवायला नकार देतात. आणि ड्रेला म्हणतात की हिंमत असेल ना तर चेंगशी लढून दाखव.
मग ड्रे मिस्टर हान कडे येतो. त्यांना म्हणतो मला शिकवा. ते कसेबसे तयार होतात
पहिले काही दिवस तर मिस्टर हान ड्रे ला म्हणतात अंगातलं जॅकेट काढ, खुंटीला टांग, स्माइल कर, परत घाल.
ड्रे वैतागतो त्याला कळत नाही की मी कुंग फू शिकायला आलो आणि हे काय चाललंय.
पण मग हळूहळू त्याला मिस्टर हान समजावतात की कुंग फू म्हणजे मारामारी नाही. तर मसल्स स्ट्रॅॅांग करणं, मनात ताबा, संयम, रागावर कण्ट्रोल आणि मेहनत हे सारंच शिकावं लागेल.
एकदा मिस्टर हान त्याला वुडांग पर्वतातील ताओवादी मंदिरात घेऊन जातात. कुंगफूमधील वेगवेगळे पंचेस शिकवतात. अनेक आठवडे तो प्रशिक्षण घेतो.
आणि मग ड्रे ला कळायला लागतं की कुंग फू नक्की काय असतं. अभ्यास कसा करतात..
शेवटी सामन्याच ड्रे जखमी होतो पण तो चेंगला कसं हरवतो, कशी फाइट करतो, काय जिंकतो आणि काय हरतो हे सांगणारी ही गोष्ट आहे.
द कराटे किड. हा सिनेमा नक्की पाहा. यात बोअर तर होत नाहीच पण बघता बघता थ्रिलिंग मॅच पाहताना आपलं आपल्यालाच लक्षात येतं की आपण ड्रे सारखं केव्हा वागतो आणि आपल्यातला चॅँगही कसा जागा होताे..
मिस्टर हान नावाचे ते काका आपल्याला वेळेत भेटायला हवे.. म्हणून त्यांना आणि ड्रे पार्करला भेटाच. फिरुन या बिजिंग!- The Karate Kid
हा सिनेमा अमेझॉन प्राइम आणि युट्यूबवरही तुम्हाला पाहता येईल.

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact