
Image: wallpapersafari
पोटाला पिशवी असणारे कांगारु ही ऑस्ट्रेलिया या देशाची मुख्य ओळख मानली जाते. पण ही ओळख अपूर्ण आहे. कोआला शिवाय ही ओळख पूर्ण होवूच शकत नाही. गोल मोठ्या डोक्याचे, गोल गोल डोळे , काळंकुट्ट नाक, अंगावर मऊ लोकर असणारा कोआला इतका गोड दिसतो की त्याला कुशीत घेवून कुरवाळावसं वाटतं. कोआला थोडा अस्वलासारखा दिसत असला तरी तो अस्वल नाही.
हेही वाचा!
कसे असतात कोआला?
हेही वाचा!

Image: wallpapersafari

Image: wallpapersafari
कोआलाच्या अंगावरील मऊ लोकर म्हणजे जणू रेनकोटच. या लोकरीमुळे पाऊस, थंडी यापासून कोआलाचं रक्षण होतं. शिवाय या लोकरीचा उपयोग कोआला निलगिरीच्या झाडावर झोपण्यासाठी कुशनसारखा करतात. या लोकरीला बाजारात ग्लव्ज, कोट बनवण्यासाठी खूप मागणी. याच कारणाने ऑस्ट्रेलियातील लाखो कोआला ब्रिटन, युरोप ,अमेरिकेत विकले गेले. पण १९२७ पासून कोआलांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. पण तरीही त्यानंतर अभ्यासकांना कोआलांच्या संख्येत मोठी घट दिसून आली. २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियात ३, २९,००० कोआलाच शिल्लक होते. त्यानंतरच्या काळातही कोआलांची संख्या घटत असल्यामुळे या गोंडस कोआलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact