इतिहास -भुगोलाच्या अभ्यासाचा सोपा फंडा. धडा वाचा पुन्हा पुन्हा!

- डाॅ. श्रुती पानसे

Image: thoughtco

इतिहास भूगोल या विषयांचा अभ्यास परीक्षेच्या काळात कसा करायचा? असा प्रश्न खूप जणांना पडतो.  कारण गणित, विज्ञान, इंग्रजी हे विषय महत्त्वाचे आणि अवघड म्हणून त्यांचा अभ्यास खूप आणि रोजच केला जातो. आणि इतिहास भूगोल हे विषय मात्र  अनेकदा बाजूला ठेवले जातात. पण परीक्षा तर इतिहास भुगोलाचीही असतेच ना? मग परीक्षेच्या वेळेस इतिहास भुगोलाचा अभ्यास आठवेनासाच होतो किंवा आता याचा कसा अभ्यास करावा हेच कळत नाही.  पण या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. इतिहास भूगोलाचा अभ्यास करताना एक गोष्ट आवर्जून करावी, ती म्हणजे  पाठ्यपुस्तकातल्या धड्यांचं वाचन.  ते एकदा दोनदा नाही तर पुन्हा पुन्हा करायला पाहिजे.

हेही वाचा!

दुसरं, संकल्पना स्पष्ट झाली असेल तर ती लक्षात घेऊन परीक्षेत लिहिता येतं. उदाहरणार्थ, भूगोलाच्या संदर्भात बोलायचं तर त्या प्रदेशांच्या वैशिष्ट्यांची माहिती, भूरूपांचे प्रकार, अशा सर्व गोष्टी या संकल्पना स्पष्ट करून घेतल्या तर लिहायलाही सोप्या जातील. भूगोल हा विषय तर शक्य तेवढा त्या त्या ठिकाणी जाऊन समजून घेण्याचा विषय असतो तो संपूर्णपणे वर्गात शिकवण्याची पद्धत असली तरी सुद्धा जेवढा तो बाहेरच्या वातावरणात शिकवला जाईल तेवढा तो आपल्याला जास्त समजणार आहे

Image: quiz-plugin

भूगोलाच्या संकल्पना कशा स्पष्ट होतील?

  • शिक्षकांनी शिकवलेल्या माहितीच्या आधारे
  • पुस्तकातल्या आकृत्यांच्या माध्यमातून
  • प्रत्यक्ष - शक्य असेल त्या - भूरूपांना भेटी देऊन त्या समजावून घेऊन
  • ते शक्य नसेल तर विविध मोठ्या चित्रांच्या सहाय्याने
  • इ लर्निंग च्या सहाय्याने

अशाप्रकारे आपण भूगोलाच्या संकल्पना स्पष्ट करून घेऊ शकतो.

भूगोलाच्या संकल्पना लिहित असताना स्वतःच्या शब्दात न लिहिता भौगोलिक तांत्रिक शब्द असतात त्यात आपल्याला लिहावे लागतात. त्यामुळे संकल्पना स्पष्ट होणे हा एक भाग झाला पण तो त्या शब्दात मांडता येणं हा दुसरा भाग आहे. त्यामुळेच पाठ्यपुस्तकांचे वाचन हा यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असतो.

इतिहासाचा खरंतर वेगळा अभ्यास करण्याची गरज काय, असा प्रश्न विचारता येऊ शकतो. याचं कारण म्हणजे इतिहासामध्ये सर्व गोष्टीच असतात. कधी त्या राजांच्या गोष्टी असतात, कधी राण्यांच्या गोष्टी असतात. तर कधी इतिहासातल्या विशिष्ट घटनांच्या नोंदी असतात. माहिती कोणतीही असली तरीसुद्धा ती गोष्टींच्या स्वरूपात दिलेली असते. देश किंवा परदेशामध्ये कोणत्या राजसत्ता होत्या, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांचे जनजीवनावर झालेले परिणाम असे विषय इतिहासामध्ये येतात. त्यामुळे ते विषय आवडीने वाचले तर त्याचा जास्त उपयोग होईल.

त्यामुळे पाठ्यपुस्तकाच्या वाचनाबरोबरच आपल्याला त्यातलं काय समजलं हे जर दुसऱ्याला व्यवस्थितपणे सांगता आलं तर आपला अभ्यास झाला असं समजायला हरकत नाही.

लेखनासाठी तुम्हाला सरावाची गरज असते. पण वर्षभराच्या काळामध्ये गृहपाठ, विविध प्रकल्प यातून लेखनाचा सराव झालेला असेल, त्यामुळे आत्ता केवळ वाचनावर भर दिला तरी चालेल.

( लेखिका ‘अक्रोड’ उपक्रमाच्या संचालक आहेत.)

shruti.akrodcourses@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : 9112050500

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact