ॲनिमेटर व्हायचं असेल तर काय करावं लागेल? काय शिकावं लागेल!

मी कोण होणार?

Image: freepik

कार्टून्स हे फक्त मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडतात.ते पाहताना मजा येते, अभ्यासाचं असो किंवा कामाचं असो सगळं टेन्शन पळून जातं. छोटा भीम, मोटू पतलू, डोरेमाॅन , सिनचॅन, ऑगी, लिटिल सिंघम, माइटी राजू, माशा, पेपा पिग हे कार्टून कॅरेक्टर्स तुम्हाला नक्कीच आवडत असतील. त्यांच्याबद्दल तुम्हाला जितकं माहिती अहे तितकंच मोठ्यांनाही माहिती असतं. कारण मोठ्या माणसांनाही हे कार्टून आकर्षित करतात. हे कार्टून काही माणसांसारखे प्राण्यांसारखे जिवंत नसतात. पण तरीही त्यांना बोलता येतं. चालता येतं, धावता येतं. कार्टून्समध्ये प्राणी बोलतात, झाडं बोलतात. इतकंच कशाला टेबल-खुर्च्या देखील चालतात बोलतात. कार्टूनन्समध्ये ही धमाल येते ती ॲनिमेशनमुळे. स्थिर चित्रांना हलतं बोलतं करण्याची जादू जमते ती ॲनिमेटरला.
ॲनिमेशन ही जादू नाही तर हे कौशल्य आहे आणि ते शिकता येतं. त्यासाठी आधी ॲनिमेटर काय करतात? ॲनिमेटर होण्यासाठी काय करावं लागेल हे समजून घ्यायला हवं.

 

हेही वाचा!

मोठेपणी किडे-मुंग्यांचा अभ्यास करणारा कीटकशास्त्रज्ञ व्हायचंय..त्यासाठी काय करावं लागेल?

ॲनिमेटर काय करतात ?

१. ॲनिमेटर्स कार्टून सिरिअल्स आणि ऐनिमेटेड फिल्म्स तयार करतात. कार्टून कॅरॅक्टर्स तयार करतात.
२. सिनेमासाठी व्हीएफएक्स तयार करतात. युट्यूब व्हिडिओ आणि जाहिरातीही करतात.
३. वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आणि मोबाईल ॲप्सही ते तयार करतात.

कोणती स्किल्स लागतात? कशाची आवड असावी लागते?
१. ॲनिमिटेर व्हायचं असेल तर चित्र, स्केचेस काढण्याची आवड हवी.
२. कल्पना करणं, गोष्टी सांगणं, माणसांचं, सभोवतालच्या जगाचं बारीक निरिक्षण करणं, त्यांच्या सवयी लकबी हेरणं हे तुम्हाला आवडायला हवं.
३. तुम्हाला कॉम्प्युटर, एनिमेशन सॉफ्टवेअर्स कशी वापरायची हे शिकण्यात रस हवा.

किती आणि काय शिकावं लागतं ?
१. दहावी, बारावीनंतर ॲनिमेशन, व्हीएफएक्समध्ये डिप्लोमा करु शकता.
२. टूडी, थ्रीडी, व्हीएफएक्स असे स्पेशलाईज्ड कोर्स करु शकता.
३. ॲनिमेशन, डिझाईन, फाईन आर्ट या विषयातील बॅचलर कोर्सही करता येतात.

मी आत्तापासून काय करू?
१. रोज थोडा वेळ चित्रकलेचा सराव करा.
२. तुमच्या आवडीच्या कार्टून कॅरॅक्टरची चित्र हुबेहुब काढता येतात का बघा.
३. तुमच्या कल्पनेतली एखादी गोष्ट चित्र काढून सांगता येते का बघा, आणि त्या चित्रांच्या वह्या जपून ठेवा.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact