खेळ खेळताना एवढा उत्साह कुठून येतो?

मेंदूचे सिक्रेटस
- डाॅ. श्रुती पानसे

Image: freepik

मैदानावर खेळत असताना आपल्या शरीराचं चलनवलन खूप जास्त होतं. आपल्याला एकाच वेळेला अनेक गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं. उदाहरणार्थ प्रतिस्पर्धी कुठे आहे? प्रतिस्पर्ध्याच्या हातातील चेंडू / शटल कुठे आहे? आपल्याला नक्की कोणत्या दिशेला पळायचं आहे? आपल्याला कोणत्या दिशेला बॉल टाकायचा आहे किंवा बॅट ? रॅकेट फिरवायची आहे का? असे अनेक प्रकारचे निर्णय हे खेळानुसार बदलत जातात आणि ते निर्णय कमी वेळात म्हणजे खरं तर काही सेकंदातच घेणं आवश्यक असतं. खो-खो सारख्या खेळामध्ये इतर खेळाडूंची बारीकशी हालचालसुद्धा नजरेतून सुटून जाता कामा अशाप्रकारे आपण खेळत असतो.

हेही वाचा!

सुटीची सवय मोडून शाळेत जाण्याचा कंटाळा का येतो?

खेळताना हात-पाय-डोळे-मेंदू ते सगळेच अवयव खूप जास्त कामात असतात. त्यामुळे शरीराचं रक्ताभिसरण अतिशय वेगात होतं. शरीराच्या वेगवेगळ्या नसा, स्नायू आणि लहान किंवा मोठ्या अवयवांकडे रक्त पोहचवण्याचं काम शरीर वेगात करत असतं. असे खेळ खेळल्यामुळे आपल्या शरीरात आणि मेंदूत ऊर्जा निर्माण होते. भूक लागते. स्टॅमिना टिकावा, शरीरामध्ये ताकद यावी यासाठी आपण आहारसुद्धा चांगला घेतो. या सगळ्याचे फायदे मेंदूला होतात.

शरीर ताजतवानं होतं. शरीरामध्ये नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढते.त्यामुळे आपण कायम उत्साही राहतो. अशा अनेक गोष्टी प्रत्यक्ष शरीरात घडत असतात.
याशिवाय मैदानात रोज खेळ खेळल्यामुळे मनाला एक शिस्त लागते. मेंदूला एक शिस्त लागते. त्यामुळे दिवसभरातल्या इतर कामांची लय सापडते रोज. मैदानात जाऊन खेळ खेळतो तेव्हा इतर खेळाडूंचे खेळ बघायला मिळतात. त्यातून आपला खेळ सुधारत जातो. मेंदूच्या दृष्टीने ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे ही प्रक्रिया खेळात अशी मदत करते.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact