मधमाशा पोळ्यात अखंड काम कशा करतात तुम्हाला हा प्रश्न पडतो का?

सुटीत काय 'पाहाल'?

- स्मिता पाटील
मुक्त पत्रकार

काय मग कशी चालली आहे सुट्टी तुमची? भरपूर खेळताय ना? हो हो, माहितीये, सध्या बाहेर भरपूर ऊन आहे. त्यामुळे दिवसा तुम्हाला खेळायला बाहेर जाता येत नाहीये ना ? मग काय करायचं? घरी बसून भरपूर खेळ खेळता येतात. ते तुम्ही मोठ्या माणसांच्या मदतीनं शोधा बरं. सुट्टी आहे म्हणून तुमचा स्क्रीन टाइम वाढला असेल.! बरोबर ना? पण आपल्याला एक करता येईल बरं. सुट्टी आहे तर दिवसभरात एक-दीड तास आपल्याला मोबाइल किंवा टीव्ही बघता येऊ शकतो. यामध्ये छान छान माहितीपट म्हणजेच डॉक्युमेण्टरीज तुम्हाला बघता येतील. विविध विषयांवरील माहितीचा खजिना असलेल्या या डाॅक्युमेण्टरीज आपलं ज्ञान वाढवतात आणि भरपूर मनोरंजनही करतात. अशा काही निवडक डॉक्युमेण्ट्रीची ओळख तुम्हाला या सुटीत करुन दिली जाणार आहेआज तुम्हाला सांगणार आहे ती डॉक्युमेण्ट्री आहे मधमाशींची. तुम्ही कधी मधमाशीचं पोळं बघितलं आहे का? मला माहितीये अनेक जणांनी कधी ना कधी मधमाशीचं पोळं बघितलं असणारे. समजा आत्तापर्यंत कुणी बघितलं नसेल तर कुठेतरी शहराबाहेर गेल्यावर किंवा आजूबाजूच्या झाडांवर बघा मधमाशीचा पोळं आहे का ? कधी कधी कुणाच्या घरी पण मधमाशीचं पोळं असतं बर का. कुणाला कधी मधमाशी चावली आहे का? बापरे खूप त्रास होतो बरं. मधमाशी चावते त्याला डंख म्हणतात. हा शब्द माहितीये का तुम्हाला? आणि मध कुणाकुणाला आवडतो? मधाचे औषधी उपयोग पण बरेच असतात. तर तुम्हाला मधमाशी, मधमाशीचं पोळं, मध, माशीचा डंख हे सगळं माहिती असणारे किंवा कधीतरी कानावर पडलेलं असणारे.

हेही वाचा!

जाळं नाही जमिनीत बीळ करणारा दारकरी कोळी

मधमाशीचं जग हे फार भन्नाट असतं. आपल्याकडे कसं कुणी ऑफिसला जाणारं असतं, कुणी देशाच्या सीमेवर देशाचं रक्षण करणारं असतं, तर कुणी घरात काम करणारं असतं. अगदी तसंच मधमाशीच्या जगात पण असतं बरं का. आपल्याला दिसताना सगळ्या मधमाशा सारख्याच वाटतात. पण त्यांच्यामध्ये भरपूर फरक आहेत. ते कोणकोणते आहेत हे सर्व आपल्याला 'मधमाशी एक अद्भूत जीवनचक्र' या 15 मिनिटांच्या माहितीपटात बघायला मिळेल.

Image: magnific.com

मधमाशीच्या कोणत्या कोणत्या जाती आहेत, त्या कुठे कुठे आहेत, आपल्या भारतात कुठल्या जाती आहेत हे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. मधमाशी नक्की काय काय काम करते ? त्यांच्याकडे कामाची रचना कशी असते? हे एवढं सुंदर मधमाशीचं पोळं त्या एकत्र येऊन कशा बांधतात, त्या खातात काय? हे तुम्हाला ही डॉक्युमेणटरी बघितल्यावर समजेल. मधमाशीचं आयुष्य कसं असतं, त्या काम कसं करतात, मधमाशीच्या पोळ्याची रचना कशी असते, त्यात कप्पे कसे असतात, त्या कप्प्यांमध्ये नक्की काय काय असतं, याची माहिती यातून तुम्हाला मिळेल, याशिवाय मधाचा उपयोग काय, हा मध कुठल्या कुठल्या फुलांपासून त्या आणतात आणि मधमाशीचा कामाचा आवाका केवढा प्रचंड असतो हेही तुम्हाला ही डॉक्युमेण्टरी बघितल्यावर कळणार आहे. ही पूर्ण डॉक्युमेण्टरी बघा आणि तुमच्या ज्ञानात किती भर पडली आहे हे आम्हाला सांगा. याशिवाय मधमाशी ही मानव जातीसाठी कशी उपयोगी आहे आणि तिचं महत्त्व आपल्यासाठी नक्की काय आहे अशी तुमची उत्सुकता ही मधमाशांची डाॅक्युमेण्ट्री पाहिल्यावर नक्की वाढेल. ती माहिती तुम्ही तुमची तुमची शोधा. मोठ्या माणसांकडून किंवा गुगल करुनही मिळेल. किंवा तुम्ही एखाद्या वाचनालयात जात असेल तर तिथे मधमाशांवर काही पुस्तक असल्यास त्या पुस्तकातूनही मिळेल. मधमाशीविषयी आणखीन शास्त्रीय माहिती घेण्यासाठी पुस्तकांची मदत घेऊन तुम्ही तुमचं ज्ञान वाढवू शकता. सुट्टी संपली की आपल्या दोस्तांना तुम्हाला यातून मिळालेली नवीन माहिती नक्की शेअर करा. त्यांनाही आवडेल. तर लगेच ही खाली दिलेली लिंक क्लिक करा आणि डॉक्युमेण्टरी बघा. आणि कशी वाटली हे मला नक्की सांगा.

ही आहे या माहितीपटाची लिंक: https://youtu.be/ljvf_Ugfz9M?si=XFuoClaD_u2IRlpn

smita.patilv@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact