खूप खूप वर्षांपूर्वी पृथ्वीचं हवामान कसं होतं हे आपल्याला कसं समजणार?

खूप वर्षांपूर्वी पृथ्वीवरचं हवामान कसं होतं हे समजण्यासाठी शास्त्रज्ञ सोप्पी आयडिया करतात.

image : research gate

 

ते खूप वर्षांपासून पृथ्वीवर असलेल्या गोष्टींचा अभ्यास करतात. तर अशा अनेक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ झाडं. काही झाडं ही अक्षरशः शेकडो किंवा काही हजार वर्षं इतक्या वयाची असतात. या झाडांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांना त्यावेळी हवामान कसं होतं याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

पण जर का हजारो किंवा लाखो वर्षांपूर्वी हवामान कसं होतं याचा अंदाज बांधायचा असेल तर? तर शास्त्रज्ञ समुद्राच्या किंवा तलावांच्या तळाशी असलेल्या दगडांचा आणि मातीचा अभ्यास करतात. याच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी बर्फाच्या गाभ्याचा अभ्यास करतात. हा बर्फाचा गाभा अंटार्क्टिका सारख्या ठिकाणाहून मिळवला जातो. आणि तोही बर्फामध्ये काही मैल खोल खणून तिथला बर्फ काढून घेतला जातो आणि मग त्याचा अभ्यास केला जातो.

 

हेही वाचा!

अबब! ओझोनच्या छत्रीला पडलेल्या छिद्राचा आकार २ कोटी ६० लाख चौरस कि.मी.. हे कसे?

image : eos.org

हा आईस कोअर किंवा बर्फाचा गाभा हा एखाद्या नळकांड्यामध्ये किसलेला बर्फ भरला तर जसा दिसेल तसा दिसतो. अंटार्क्टिकावरचा बर्फ हा अनेक थरांमध्ये साचलेला असतो. त्यातला प्रत्येक ठार हा वेगवेगळ्या काळात तयार झालेला आहे. यातल्या प्रत्येक थरातल्या बर्फात थोडेफार हवेचे बुडबुडे अडकलेले असतातच. या हवेच्या बुडबुड्यांचा अभ्यास करून त्यात किती कार्बनडायऑक्साईड होता याचा अंदाज घेतला जातो.
याच थरांमधून काढलेल्या आईस कोअर्सचा अभ्यास करून त्यावेळच्या तापमानाचा अंदाज काढता येऊ शकतो. एखाद्या वाढत्या आकाराच्या हिमनदीवर जेव्हा पुन्हा पुन्हा बर्फ पडून साचतो त्यावेळी त्यातल्या पाण्याच्या रेणूंमध्ये त्यावेळच्या हवेचं तापमान किती होतं त्याच्या एक प्रकारच्या नोंदी होत असतात.
हा सर्व अभ्यास अत्यंत काळजीपूर्वक केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणच्या नोंदी एकमेकांशी ताडून बघितल्या जातात. त्या नोंदी जर एकमेकींशी जुळल्या नाहीत तर पुन्हा पुन्हा तो अभ्यास केला जातो. हा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना पॅलिओक्लायमॅटॉलॉजिस्ट असं म्हणतात.

काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले? लग्गेच कळवा! -कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact