सुटीत एकही दिवस बोअर न होण्याचं चॅलेन्ज घेणार का?

- गौरी पटवर्धन

तर तुम्हाला फायनली सुट्ट्या लागल्या! हुश्श! शाळेचे शेवटचे दिवस फार हळू हळू जातात. त्यावेळी सुट्ट्या लागल्यावर आपण काय काय करणार याचे तुमचे खूप प्लॅन्स तयार असतात. पण जसजसे दिवस जायला लागतात तसे त्यातले काही प्लॅन्स मागे पडतात किंवा त्यातल्या काही गोष्टी करून होतात. आईस्क्रीम खाऊन होतं. उशिरा उठून होतं. दिवसभर लोळून होतं. आणि मग मात्र त्याचाही कंटाळा यायला लागतो. अजून भरपूर सुट्टी शिल्लक असते आणि “आता मी काय करू?” हा प्रश्न तुम्हाला त्रास देत असतो. मग तुम्ही तोच प्रश्न आईवडिलांना विचारून त्यांना त्रास द्यायला सुरुवात करता. आणि शेवटी ऐन सुट्टीत बोअर व्हायला लागतं आणि शेवटी 'शाळा सुरु होती तेच चांगलं होतं की काय?' असं वाटायला लागतं.

पण आपण जर सुट्टीच्या सुरुवातीला थोडं प्लॅनिंग केलं तर आपली संपूर्ण सुट्टी एकदम मजेत जाऊ शकते. “आता मी काय करू?” असा प्रश्न सारखा सारखा मोठ्या माणसांना विचारायला लागणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला एक फार महत्वाची गोष्ट लागणार आहे. अशी गोष्ट जी तुम्हाला सुट्टीत तर मजा आणेलच पण शाळा सुरु झाल्यानंतर सुद्धा तुमच्या बरोबर राहील. पण त्या गोष्टीसाठी तुम्हाला काही गोष्टी द्याव्या लागतात. थोडे प्रयत्न करावे लागतात. आणि कदाचित काही वेळा स्वतःच्या मनाविरुद्ध वागायला लागतं. पण त्या गोष्टीइतकी भारी गोष्ट जगात दुसरी कुठलीच नसते.
ती गोष्ट कुठली माहितीये?- मैत्री!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact