म्हणींची चित्र काढा आणि चित्रांवरून म्हणी ओळखा!

आज काय 'कराल'?

- विनय र. र. 

Image - Google.


चित्र काढायला कोणा कोणाला आवडतं? मला वाटतं खूप जणांना चित्र काढायला आवडतं. कोणी म्हणतील आम्हाला चित्रं काढायला आवडतं पण आमची चित्र खूप छान नाही येत. बरं. तुम्हाला अक्षरं, शब्द लिहीता येतात. बरोबर. आपल्याला चित्राचा जो खेळ खेळायचा आहे त्यासाठी हे शब्दच लागणार आहेत. नुसते शब्द एकापुढे एक लिहीले तर त्यांची एक चित्र रचनाच होते. अशा शब्द मांडणीतून पूर्ण वाक्य न लिहीता सुद्धा म्हण लिहीता येईल!
एक उदाहरण देतो 'केले सांगितले'. यात एक म्हण दडली आहे. कोणाला ओळखता येईल? मी आधी काय लिहीले आहे? - आधी. आणि मग काय लिहीले आहे? - सांगितले. सापडली म्हण? 'आधी केले, मग सांगितले! ' बरोबर! अशा आणखी म्हणी शोधा बरं! पोटोबा विठोबा चालेल?

शब्द तिरपे तारपे, जाड, बारीक, ठसठशीत, वर, खाली किंवा गुंतलेले अशी रचना केली की त्याला चित्र म्हणता येईल. अशी शब्द चित्रं काढून आपण काही कोडी तयार करू. त्या कोड्याचे उत्तर म्हणजे एक म्हण असेल किंवा वाक्प्रचार असेल. करायचा प्रयत्न?

मी एकदम सोप्पं शब्द चित्रं कोडं घालतो त्यातली म्हण ओळखून दाखवा. करावे, असावे, नसावे, भरावे, धरावे रडावे - या शब्द चित्रात कोणती म्हण आहे? उत्तर - करावे तसे भरावे - कारण बाकीची अक्षरे वेगळी आहेत. याच प्रकारे - जसा भाव तसा देव - या म्हणी चे शब्द चित्र काढून बघा. अशाच प्रकारे - डाव्या उजव्या बाजूला असणाऱ्या शब्दांच्या मांडणी वरून एखाद्या म्हणी चे शब्द चित्र काढून पहा. उदाहरणार्थ - ..दान ..कळू नये. (डाव्या हाताचे - दान - उजव्या हाताला - कळू नये. शब्द एका ओळीत लिहीण्याऐवजी वर खाली लिहीले तर? उदाहरणार्थ - चोरावर मोर लिहायचे असेल तर असे लिहीता येईल - मोर - चोरा आणि असे लिहिले तर कोणती म्हण दिसेल?
दिव्या - अंधार! एखाद दुसरा शब्द वाढवून काढलेल्या शब्द चित्रात म्हण गुंफता येईल - उदाहरणार्थ - गर्वाचे घर खाली. शहाण्याचे‌ घर - गर्वाचे घर!

आता तुम्ही प्रयत्न करून बघा!