तुमच्या कुठल्या डोळ्याचं तुम्ही जास्त ऐकता? शोधून पाहा!

 

Image: paireyewear

तुमचे तुमच्या एका डोळ्यावर जास्त प्रेम आहे. असे म्हटले तर तुम्ही आम्हाला वेड्यात काढाल. आमचा स्क्रू ढिला झाला आहे का अशी शंका तुम्हाला येईल. पण आम्हाला खात्री आहे. तुमचे तुमच्या एका डोळ्यावर जास्ती प्रेम आहे.  त्याचेच तुम्ही ऐकता, दुसऱ्याचे अज्जिबात ऐकत नाही. चला सिद्ध करू या !

हे कसं सिध्द करणार?

१ .घरा बाहेर बघा.

२. मूठ बंद करून उजवा हात लांब करा. 

३. मुठीतले पहिले बोट मुठीबाहेर काढा.

४ . दूरवर दिसणारे झाड किंवा कोणतीही स्थिर वस्तू त्या बोटाने दाखवा. बोट हालवू नका.

हेही वाचा…

५. एकदा उजवा डोळा बंद करा एकदा डावा डोळा बंद करा.

६. कोणता डोळा बंद केला की बोट हललले दिसते?

७ . तो तुमचा लाडका डोळा. त्याचे तुम्ही मानता, दुसऱ्याचे मानत नाही.

image : pullUSA magazine

किती जणांचा उजवा डोळा लाडका आहे? किती जणांचा डावा डोळा लाडका आहे? तुम्ही जर का उजवा हात जास्त वापरत असाल तर तुमचा उजवा डोळा लाडका असण्याची शक्यता जास्त असते. मात्र तुम्ही जर का डावखुरे असाल तर तुमचा दावा डोळा लाडका असण्याची शक्यता जास्त असते. आपला एक डोळा दुसऱ्या डोळ्यापेक्षा जास्त लाडका किंवा सक्षम असतो हे लक्षात आलं, की काही नेमबाज डावा डोळा बंद करतात आणि काही उजवा बंद करतात असं का तेही लक्षात येईल. 

माणसामध्ये एक डोळा लाडका असण्याचा फायदा कोणता आहे? तोटा कोणता आहे?

करून पाहा बरं विचार!!

-मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग