स्वयंपाक करण्यासाठी आधी सामुग्रीची निवड करणं जमायला हवं!

स्वयंपाकघरातली लुडबुड

- वैभव भाल्डे

Image: freepik

काय बच्चे कंपनी, तयार आहात ना स्वयंपाकघरात खुडबूड करायला? मजा असते बरं फार!! सगळ्यात आनंदाचा भाग सांगू का? मस्त वेळ जातो नी शेवटी पोटही भरतं!! अर्थात त्यासाठी बऱ्यापैकी खटपटही करावी लागते. हे सगळं सुरु होतं, सामुग्री निवडण्यापासून. सामुग्री म्हणजे सामान. तयार पदार्थ कसा हवाय, ह्यावर सामुग्रीची निवड अवलंबून असते, सरबत लगेच प्यायचं असेल तर पाणी थंडगारच हवं, नाही का? तुम्ही जे जे वापरणार ते निवडण्याच्या काही सोप्या टिप्स देणार आहे मी.
ज्या गोष्टींची एक्सपायरी डेट दिलेली असते, त्या गोष्टी निवडणं सोपं असतं. त्या तारखेच्या आत ती वस्तू वापरायची असल्यास फार विचार करायची गरज नाही. बिस्कीटच्या पुड्यासारख्या वस्तू विकत आणताना ही तारीख बघायची सवय लावा. मॉलमध्ये बरेचदा एकावर एक मोफत वगैरे ज्या गोष्टी विकतात नं, त्या बरेचदा ही एक्सपायरी डेट जवळ आलेल्या असतात!!
भाज्या, फळं प्रत्येक सिझन मध्ये मिळणारी, स्थानिक व ताजी घ्यावीत. सुरकुतलेल्या सालींची, मरगळलेली नको. आणलेली प्रत्येक गोष्ट स्वछ धुतल्याखेरीज वापरू नये. कृत्रिम रंग लावल्यासारखी वाटली तर, कलिंगड वगैरे सारखी फळं टाळा. धान्य वापरत असलात तर पोचट/पोकळ धान्य वापरू नका, ते नेहमी भरीव व जड असायला हवं. ती सकस धान्याची खुण असते बरं. एकदा का वापरलेली सामुग्री चांगली असली की बघा तुमच्या चिमुकल्या हातांची गोडी पदार्थात कशी मस्त उतरते!!

( लेखक 'मुंबई स्वयंपाकघर'- फेसबुक ग्रुपचे सदस्य आहेत.)

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact