दक्षिण आफ्रिकेतल्या एका नदीत इंद्रधनुष्य अवतरतं. हा चमत्कार कसा घडतो?

 Image: bbc.com

' मी इंद्रधनुष्य पाहिलं!' असं कौतुकानं सांगणरी माणसं आपल्या आजूबाजूला असतात. त्यांना आकाशातलं इंद्रधनुष्य बघितल्याचा खूपच आनंद झालेला असतो. कारण पावसाळ्यात कधीतरी  दिसणारं इंद्रधनुष्य एरवी आपल्याला इच्छा झाली आणि पाहात आलं असं होत नाही. आकाशात इंद्रधनुष्य दिसणं म्हणजे वातावरणातील विशिष्ट स्थितीत निसर्गाचा होणारा चमत्कारच. पण जर तुम्हाला असं सांगितलं की आपल्या पृथ्वीवर अशीही एक जागा आहे तिथे विशिष्ट काळात गेलं तर ते दिसतं, इतकंच नाही तर त्याला स्पर्शही करता येतो. कारण हे इंद्रधनुष्य आकाशात नसून जमिनीवर , नदीच्या पाण्यात असतं. आता पाण्यातलं इंद्रधनुष्य यावर तुमचा विश्वास सहज बसणार नाही, हे माहीत आहे. पण तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. कारण पाण्यातलं इंद्रधनुष्य ही कल्पना नसून सत्य आहे.

हेही वाचा!

असं जवळून बघता येणारं, हातानं स्पर्श करता येवू शकणारं इंद्रधनुष्य दिसतं ते दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया येथील 'कॅनो क्रिस्टल्स' नावाच्या नदीत. ही नदी तशी लहानच. फार लांब नाही. म्हणजे १०० कि.मी पर्यंत वाहात जाणारी आणि २० मीटर रुंद असणारी ही नदी कोलंबियातील मेटा विभागातील ' सेरानिया डी ला मॅकॅरेना' या डोंगररांगातून वाहाते. या नदीत जुलै ते डिसेंबर दरम्यानच्या काळात एक अदभूत घटना घडते. या काळात नदीत तेजस्वी रंगांचं इंद्रधनुष्य अवतरतं. या नदीच्या पाण्यात रंगांचा स्फोट झाला आहे, इतके या नदीतले रंग प्रखर आणि तेजस्वी दिसतात.

Image: theguardian

नदीच्या पात्रात इंद्रधनुष्याचे रंग?

कॅनो क्रिस्टल्स नदीच्या पात्रात दिसणारे हे रंग असतात या नदी पात्रातील जलीय वनस्पतींचे. या वनस्पती जेव्हा फुलतात तेव्हा नदी लाल- गुलाबी, पिवळा, हिरवा, निळा आणि काळा या पाच रंगांनी नदी नटते. या पाच रंगांमुळे चित्रातल्या नदीप्रमाणे देखण्या दिसणाऱ्या या नदीला 'फाइव्ह कलर रिव्हर' असंही म्हणतात. कॅनो क्रिस्टल्स नदीच्या पात्रात फुलणाऱ्या या जलीय वनस्पतींना 'मॅकेरेनिया क्लॅव्हिग्रा'असं म्हणतात. या वनस्पती नदीचा प्रवाह जिथे जोरात असतो तिथे नदीतल्या खडकांना घट्ट धरुन या वनस्पती वाढतात. कॅनो क्रिस्टल्स नदीप्रमाणे सेरानिया डी ला मॅकॅरेना या पर्वत रांगांमधील काही नंद्यामध्येही या जलीय वनस्पतींचे रंग अवतरतात. पण इतर नंद्यांमधले रंग हे कॅनो क्रिस्टल्स नदीतल्या रंगांप्रमाणे तेजस्वी नसतात. नदीतलं इंद्रधनुष्य ज्याला 'लिक्विड रेन्बो' म्हणूनही ओळखलं जातं हे इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीवरला अदभूत देखावा आहे.

एकतर कॅनो किस्टल्स या नदीचं पाणी अतिशय निर्मळ आणि पारदर्शक आहे. नदीच्या पात्रातलं पाण्याचं विशिष्ट प्रमाण आणि स्वच्छ सूर्यप्रकाश अशा विशिष्ट स्थितीत वाहणाऱ्या नदीत हिरवा , पिवळा, लाल, जांभळा हे रंग उठून दिसतात. या नदीतच्या पात्रात कधी निळा, भडक गुलाबी, नारिंगी , तपकिरी हे रंगही दिसतात. कॅनो क्रिस्टल्स नदीच्या पात्रात फुलणाऱ्या या जलीय वनस्पतींंचं नाव 'मॅकरेनिया क्लॅव्हिग्रा'आहे. ही जलीय वनस्पती एक शेवाळाचाच प्रकार आहे.


पण या वनस्पती खूपच नाजूक आणि संवेदनशील असल्याने त्या सुरक्षित राहाण्यासाठी पर्यटकांना अंगाला सनस्क्रीन लावून किंवा विविध किड्यांपासून संरक्षण करणारे क्रीम मलम लावून पाण्यात उतरण्यास मनाई केली जाते. कॅनो क्रिस्टल्स नदीतील या जलीय वनस्पतींचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी पर्यटकांवर अनेक बंधनं आहेत. एका दिवशी केवळ २०० पर्यटकांना कॅनो क्रिस्टल्स नदीतील वनस्पतींचा रंगीत देखावा नव्हे पाण्यात विरघळलेलं हे इंद्रधनुष्य पाहाता येतं.

आपण प्रत्यक्ष कोलंबिया येथे जावून हे सौंदर्य आता पाहू शकत नसलो तरी पाण्यातल्या या इंद्रधनुष्याचे सुंदर फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहेत. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact