
- परीक्षा आहे म्हणून तासनतास बसून अभ्यास केला. पण परीक्षेत पेपर लिहिताना काही आठवलंच नाही तर? - हे असं होतं याला कारण अभ्यासाची चुकीची पध्दत. या चुका समजून घेतल्या तर पेपर लिहिताना काहीही न आठवण्याचा धोका नक्कीच टाळता येतो.
- अभ्यास हा फक्त परीक्षेसाठीचा तात्पुरता नसावा. अभ्यास हा विषय समजून घेण्यासाठी आणि नियमित करायला हवा. धडा बारकाईने वाचणे, धड्याखालचे प्रश्न सोडवणे, स्वत:च्या नोटस काढणे हे केलं जात नाही. आणि परीक्षा तोंडावर आल्यावर गाइडसचा उपयोग करुन केवळ प्रश्नांची उत्तरं पाठ करण्यावर भर दिला जातो. असं सरसकट पाठांतर करताना अवघड गोष्टी समजून घेतल्या जात नाही. असा वरवर आणि घाईघाईने अभ्यास केला तर विसरायला होतं.
- झोपेचा आणि लक्षात ठेवण्याचा जवळचा संबंध आहे. झोप शांत आणि पुरेशी झालेली नसल्यास त्याचा स्मरणशक्तीवरही परिणाम होतो.
- अभ्यास करताना वाचण्यासोबतच स्वत:च्या नोट्स काढणं, लिहून बघणं हेही महत्वाचं असतं. त्यामुळे आपण जे वाचतो ते मेंदूत पक्कं होतं. पण कधी लिहूनच बघितलेलं नसेल तर पेपर सोडवताना उत्तरं नीट आठवत नाहीत.
हेही वाचा!
गणित - भूमितीचा पेपर घाबरत नाही काॅन्फिडन्सने सोडवा!
- परीक्षेची भीती वाटत असल्यास, परीक्षेचा ताण घेतलेला असल्यास, पेपर सोप्पा जाईल की अवघड, मार्क्स किती पडतील याचाच विचार मनात सुरु असेल तर पेपर लिहिताना गोंधळ उडतो. अभ्यास झालेला असूनही काही आठवत नाही.
- पेपरला जाताना शेवटच्या क्षणापर्यंत काहीना काही घाईघाईत वाचणं सुरु असेल तर मेंदू गोंधळतो. परीक्षेत सर्व नीट आठवून पेपर नीट लिहिता येण्यासाठी वाचन लेखन यासोबतच चिंतन-मननही आवश्यक असतं. अशाप्रकारच्या अभ्यासाने त्याला वेळच मिळत नाही. आणि ऐनवेळीस खूप वाचलेलं असूनही काहीच आठवत नाही.
आपण अभ्यास कसा, कोणत्या पध्दतीने केला आहे यावरच आपल्याला परीक्षेत सर्व आठवून पेपर नीट लिहिता येईल की नाही हे अवलंबून असतं.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


