प्राण्यांच्य पिल्लांनाही आवडते दंगा मस्ती करायला. खेळता खेळता ती शिकतातही!

Image: .freepik.

आपल्याला कंटाळा आला की आपण काय करतो, तर मस्त खेळायला जातो. घरात भावंडं असतील तर घरातल्या घरात खेळायलाही मजा येते. पण नसतील तरी बिघडत नाही. कारण मित्र मैत्रिणी असतात. मित्र मैत्रिणींसोबत खेळून आल्यावर , दंगा करुन झाल्यावर किती भारी वाटतं ना.. पण खेळायला, दंगा-मस्ती करायला फक्त आपल्यासारख्या लहान मुलांनाच आवडतं असं नाही तर प्राण्यांच्या पिल्लांनाही खेळायला जाम आवडतं. प्राणीही एकमेकांशी खेळतात. पण प्रत्येक प्राण्याचा खेळण्याचा उद्देश वेगवेगळा असतो. ते एकमेकांशी खेळत असताना त्या खेळातून ते शिकत असतात. खेळण्यातून त्यांच्या अंगातलं कौशल्य विकसित होत असतं.

हेही वाचा! 

 Image: freepik

कुत्र्याची किंवा मांजराची पिल्लं खेळताना बघितली आहेत का? ही पिल्लं एकमेकांचा पाठलाग करतात. एकमेकांच्या अंगावर उड्या मारतात इतकंच नाही तर एकमेकांना चावतात देखील. पाहाणाऱ्याला वाटतं की हे एकमेकांचा जीव घेतील. पण तसं होत नाही. एकमेकांना मोठी जखम करण्याआधी ते थांबतात. आपल्यालेखी हे भांडण असतं, पण कुत्र्या मांजराच्या पिल्लांचा तो खेळ असतो. या खेळातून ही पिल्लं पुढे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या धोक्यासाठी, अचानक त्यांच्यावर होऊ शकणाऱ्या आक्रमणासाठी तयार होत असतात.

अस्वलाची पिल्लं दंगा करण्यात एकदम पटाईत असतात. पृथ्वीवरील सर्वात खेळकर पिल्लं अशी त्यांची ओळख आहे. या अस्वलांच्या पिल्लांचा दिवस उनाडपणा करण्यातच जातो. ते एकमेकांशी कुस्ती खेळतात. एकमेकांना झटके देतात. ते त्यांची सर्व ऊर्जा अशी उनाडपणे खेळण्यात घालवतात. पण या उनाडपणातून त्यांच्या अंगी असलेल्यं कुस्तीचं कौशल्य चांगलं पक्कं होतं.

छोट्या डाॅल्फिन माशांचा खेळही भारी असतो. ते पाण्यात शिट्टी वाजवून हवेद्वारे पाण्यात वर्तुळं तयार करतात आणि या वर्तुळांचा पाठलाग करतात. ती वर्तुळं धरण्याचा प्रयत्न करतात. या खेळातून ध्वनीच्या दिशेने वेगाने जाण्याचा सराव होतो या खेळातून. मासे गरज नसताना पाण्यात मोठमोठे सूर मारुन अडथळ्यांवर मात करण्याचं आपलं कौशल्य पक्कं करत असतात. समुद्राच्या किनाऱ्यावर आपण बसलेलं असू आणि मासे पाण्यातून बाहेर येवून मोठा सूर मारताना दिसले की समजायचं यांचं खेळणं अधिक शिकणं सुरु आहे ते..

 Image: nbcnews

कांगारुंची पिल्लं जाॅइज म्हणून ओळखली जातात. ते त्यांच्या आईशी मारामारीचा खेळ खेळतात.  आईला ते मारतात. मग आईही त्यांच्यावर पंजा उगारते. पण आपण हे सर्व मज्जा म्हणून करतोय हे सांगण्यासाठी दोघेही एकमेकांकडे पाहात डोकं हलवतात. आई आणि पिल्लांमधल्या या बाॅक्सिंगमुळे कांगारुंच्या पिल्लांमध्ये पुढे जावून वर्चस्व गाजवण्याचे कौशल्य विकसित होते.

घोड्यांची पिल्लं जन्माला आल्यावर, त्यांना चालायला यायला लागलं की ते चौखूर उधळण्याचा खेळ खेळतात. यामुळे त्यांच्यात असलेलं पळण्याचं कौशल्य पक्कं करतात.

युगांडामध्ये चिंपाझीच्या खेळण्याचा अभ्यास  करताना अभ्यासकांना मादी चिंपाझी बाहुल्यांसोबत खेळतान आढळली. बाहुली  म्हणजे आपण मुलं जी बाहुली खेळतो तशी नाही. तर काडीची बाहुली. आपल्यासाठी ती काडी असते पण मादी चिंपाझीसाठी ती बाहुलीच असते. या काडीशी खेळण्यातून पुढे आई झाल्यानंतर  आपल्या पिल्लांना सांभाळण्याची प्रॅक्टिस या मादी चिंपाझी करत असतात.

Image: cupofjo

खेळणं  नुसतं मजेसाठीही..

प्रत्येक प्राणी खेळण्यातून काहीतरी शिकत असतात किंवा शिकण्यासाठीच ते खेळतात असं नाही. तर काही प्राणी हे केवळ मौज वाटावी, आनंद घेण्यासाठीही खेळतात. ज्यांना बघून भितीच वाटते अशा मगरी आपल्या पाठीवर लहान प्राण्यांना बसवून मस्त सैर करुन आणतात. छोटी छोटी हत्तीची पिल्लं नदी किनारी चिखलात लोळतात. कवचधारी सागरी किटक त्यांना हवेत उडता येत नाही, पण ते तसं उडल्यासारखं करतात आणि त्यांच्यासारखं बघून इतर किटकही या खेळात मजा म्हणून सहभागी होतात. 

केवळ मोठे प्राणीच नाही तर लहान किटक मुंग्या देखील लढण्याचा, स्व संरक्षणाचा सराव करण्यासाठी मारारीचा, एकमेकांवर आक्रमण करण्याचा खेळ खेळतात आणि पुढे जगण्यासाठी त्यांना हवं असलेलं कौशल्य विकसित करतात. प्राण्यांच्या जगातले हे खेळ, त्यांची दंगा मस्ती एकदम भारी आहे ना?

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact