- विनय र.र.
( मराठी विज्ञान प्रसारक)

मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक सुपर-डुपर मजेदार आणि रोमांचक सफर करणार आहोत – शेतात खत घातलं तर हवेत किती 'सुपर व्हिलन' वायू येतात याची!
तुम्ही शेतात युरिया किंवा नायट्रोजन खत घालता ना? पिकं हिरवीगार, मोठी आणि भरपूर धान्य देणारी यावीत म्हणून. पण सुपरहीरोच्या मागे नेहमी एक सुपर व्हिलन असतोच! इथे तो व्हिलन आहे . नायट्रस ऑक्साइड (N₂O)! लोक याला हसवणारा वायू (laughing gas) म्हणतात, पण हा हसवत नाही, तर पृथ्वीला जाळतो!
हा 'सुपर' का आहे?
कार्बन डायऑक्साइड (CO₂) हा सामान्य व्हिलन आहे, पण नायट्रस ऑक्साइड त्याच्या २६५ ते ३०० पट जास्त शक्तिशाली आहे! म्हणजे एक छोटीशी नायट्रस ऑक्साइड ची बाटली कार्बन डायऑक्साइडच्या ३००बाटल्या इतकी उष्णता पकडते! वाह! हे सुपर पॉवर आहे ना?
हेही वाचा!
आपल्या ताटातल्या पदार्थांमुळेही पृथ्वीचं तापमान वाढतं.ते कसं?
हवेत हा वायू येतो कसा?
- शेतात खत घातलं की मग झाडं फक्त थोडंसंच नायट्रोजन घेतात. उरलेलं खत मातीत राहतं. मातीतले छोटे-छोटे सूक्ष्मजीव (बॅक्टेरिया) पार्टी करतात! ते या नायट्रोजनला बदलतात आणि या पार्टीतून नायट्रस ऑक्साइड वायू बाहेर पडतो – भुप्! आणि तो सरळ हवेत उडतो!
- किती मोठी पार्टी चालते? जगभरात शेतीतून ६० -७० % नायट्रस ऑक्साईड येतो! भारतात खूप युरिया वापरतात, त्यामुळे आपल्याकडेही हा वायू भरपूर येतो. १०० किलो युरिया घातला तर सुमारे १ ते २ किलो नायट्रस ऑक्साइड हवेत जाऊ शकतो. हे कार्बन डायऑक्साइड समतुल्य हजारो किलो होतं! म्हणजे एका छोट्या शेतातूनच मोठी उष्णता बाहेर पडते!
- हा सुपर व्हिलनच सुपर नुकसान करतो! पृथ्वीला जास्त गरम करतो - इतका की उन्हाळ्यात तापमान ५० डिग्री पर्यंत वाढते! कधी दुष्काळ, कधी पूर, तर कधी वादळांचा धुमाकूळ! नायट्रस ऑक्साइड हा सुपर व्हिलन ओझोन थराला भोक पाडतो आणि त्याचा परिणाम म्हणून सूर्याच्या किरणांमुळे त्वचा जळते, डोळे दुखतात. हवामान बदलते त्यामुळे पिकंही रडतात!

आता माणसाने काय करायला हवं?
- त्रासदायक सुपर हिरोला रोखण्यासाठी माणसालाच सुपर हिरो बनावं लागेल.
- जास्तीचं खत घालू नये– नेमकं किती हवं तेवढंच खत घालायचं! योग्य वेळी घालायचं – पिकाला खरंच भूक लागली तेव्हा घालायचं! मॅजिक युरिया वापरायचा. ज्यात उरेझ इनहिबिटर असतं, नायट्रस ऑक्साइड ४०-५० % कमी होतो! शेणखत, सोनखत, कंपोस्ट, सेंद्रिय खतं.. ही नैसर्गिक आणि सुपर फ्रेंडली खतंच वापरावी. शेतात झाडं लावायला हवीत. शेततळं बनवायला हवीत. हे सगळे नायट्रस ऑक्साइड शोषून घेतात!
मित्रांनो, खत घालणं म्हणजे पिकांना खाऊ घालणं आहे, पण जास्त खाऊ दिला तर पोटदुखी होते! तसंच इथे पण. थोडं कमी, पण स्मार्टपणे करूया. आपण सगळे मिळून पृथ्वीला थंड ठेवूया आणि शेतीही सुपर यशस्वी करूया! तुम्हीही सुपरहीरो आहात का? मग बोला – 'मी नायट्रस ऑक्साइडला थांबवणार!'
vinay.ramaraghunath@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


