सई आणि उंदीर – भाग ६

सईची खडखड आवाजाने झोपमोड होऊन उठली तेव्हा ती तिच्या खोलीत झोपलेली होती. आणि तिला स्वप्नही तिच्या खोलीचंच पडलं होतं. आणि स्वप्नात पडलेला खडखड आवाज मात्र जागं झाल्यानंतर पण येतच होता. त्यामुळे सई सॉलिड कन्फ्यूज झाली. काय खरं आणि आणि काय स्वप्न तेच तिला कळेना. दोन मिनिटांनी जरा नीट स्वच्छ जाग आल्यावर तिच्या लक्षात आलं की हा आवाज खरंच आपल्या टेबलवरून येतोय आणि जागेपणी येतोय, म्हणजे तो खरा आहे. आणि मग तिला एकदम करंट लागला, “उंदीर!” असं म्हणून ती टुणकन पलंगावरून खाली उतरली आणि टेबलाकडे गेली.

तर तिथे, त्या रिकाम्या पिंजऱ्यात, तो भलामोठा उंदीर अडकला होता. तोच बाहेर जाण्याची वाट शोधत खुडखूड करत होता आणि त्यानेच सईची झोपमोड झाली होती. ‘आता बघते याच्याकडे. माझे बूट आणि कपडे कुरतडतोस काय?’ असं मनात म्हणत सई पिंजऱ्याच्या जवळ गेली आणि त्या उंदराला म्हणाली,

“काय रे ए उंदऱ्या!”

इतका वेळ पिंजऱ्यात इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पळापळ करणारा उंदीर एकदम एका जागी शांत उभा राहिला आणि लुकलुकत्या डोळ्यांनी तिच्याकडे बघायला लागला. मग सईच परत म्हणाली,

“बघतोस काय नुसता? माझे बूट आणि कपडे का खाल्लेस रे? मला शाळेत सगळे जण किती हसले माहितीये का?”

तरी उंदीर काही बोलेना. उलट त्याने परत कुठून पळून जायला जागा आहे का ते शोधायला सुरुवात केली. मग सईचा अजून संताप झाला. आई जशी तिला रागवायची, तशी ती उंदराला रागवली,

“ए उंदऱ्या! आपल्याशी कोणी बोलत असेल तर समोर उभं राहून त्या माणसाकडे बघून त्याला उत्तर द्यावं. मी इथे तुला काहीतरी महत्त्वाचं विचारतीये आणि तू इकडेतिकडे काय फ़िरतोयस? माझ्यासमोर उभा रहा आणि मला नीट उत्तर दे! तू - माझे - बूट - आणि - कपडे - का - कुरतडलेस?”

इतका वेळ पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात इकडेतिकडे पळापळ करणारा उंदीर आता एका जागी उभा राहून सईकडे बघत होता. आणि त्याच्या चेहेऱ्यावरून असं वाटत होतं की तो सॉलिड काहीतरी विचार करतोय. सई म्हणाली,

“एवढा विचार करण्यासारखं काही नाहीये त्यात. पटकन सांग तू माझं नुकसान का केलंस?”

उंदराने क्षणभर विचार केला आणि तो म्हणाला,

“सॉरी. मी मुद्दाम नाही केलं.”

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact