
Image: freepik
आपल्या आजूबाजूचे सजीव कोणते? असा प्रश्न आपल्याला शाळेत जेव्हा विचारला जातो तेव्हा 'झाड' हे उत्तर आपण किती पटकन देतो ना. झाड एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर जावू शकत नसले तरी झाड लहानाचं मोठं होतं, झाडाला पानं, फळं, फुलं येतात, यावरुन ते सजीव आहे, झाडात जीव आहे हे आपल्याला माहित असतं. एक झाड अनेक सजीवांचा आधार असतं. एक झाड कितीतरी जीवांना जगण्यास सहाय्य करत असतं. पण झाडावरही अनेक संकटं येतात, झाडालाही काही हवं असतं, पण झाड गप्प एका जागी उभं असलेलंच आपल्याला दिसतं. पण दिसतं तसं नसतं. झाड गप्प उभं नसतं. झाडही बोलू शकतं. खरंतर झाड जेव्हा संकटात असतं, झाडाला जेव्हा पाणी हवं असतं तेव्हा झाड बोलतं. झाडाचं हे बोलणं शास्त्रज्ञांना ऐकू आलं. त्यांनी झाडाच्या बोलण्याचा खोलात जावून अभ्यास केला आणि झाडांना जेव्हा टेन्शन येतं, तेव्हा झाडं बोलतात या निष्कर्षापर्यंत शास्त्रज्ञ येवून पोहोचलेत. झाडं बोलतात, ती कशी बोलतात, केव्हा बोलतात याबाबतचं संशोधन इस्त्रायलमधील शास्त्रज्ञांनी केलं आहे.
झाडांना आवाज आवडतात, त्यांच्या भोवतालच्या निरनिराळ्या आवाजांना झाडं प्रतिसाद देतात. झाडांची वाढ चांगली व्हावी यासाठी झाडांना पाणी घालताना संगीत लावावं असं म्हटलं जातं. भुंगे फुलांवर जेव्हा गुणगुण करतात तेव्हा फुलांमध्ये गोड परागकण तयार होतात्. आवाजांना प्रतिसाद देणारी झाडं स्वत: देखील बोलतात.
हेही वाचा!
झाडं कशी बोलतात?

Image: newsforkids

Image: .freepik
झाडांची संवादाची पध्दत
झाडं वेगवेगळ्या परिस्थितीत विशिष्ट आवाज काढून बोलतात, काहीतरी सांगतात, ही गोष्ट आता लक्षात आली असली तरी झाडांची संवादाची विशिष्ट पध्दत असते असं इतर शास्त्रज्ञांनी शोधलं आहेच. झाडांवर जेव्हा विशिष्ट किटक/ कीड हमला करते तेव्हा हे झाड विशिष्ट रसायन हवेत सोडून धोका असल्याचा संदेश इतर झाडांना देतात. त्यामुळे इतर झाडं सावध होतात. आपल्यावर किडीने हमला करु नये यासाठी आधीच विशिष्ट रसायनं हवेत सोडतात जी या किडीला त्यांच्यापासून दूर ठेवतात
झाडांचा अल्ट्रासाॅनिक आवाज कोणाला कळतो?
डाॅ. हॅडनी म्हणतात झाडांवर अवलंबून असलेले उंदीर, पतंग ( किडा) यांना झाडांनी केलेला अल्ट्राॅसाॅनिक ध्वनी ऐकायला येतो आणि त्याचा अर्थही कळतो. जेव्हा झाडं आजारी असतं तेव्हा झाडं आवाज करतं तेव्हा या झाडापासून आपण काही काळ दूर राहायला हवं, ते झाड टाळायला हवं हे उंदीर आणि पतंगाला समजतं.

Image: freepik
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact