-डॉ. वैशाली देशमुख

Image: freepik
आज शाळेत शरद सर बास्केटबॉलची टीम निवडणार होते. वर्गातल्या सगळ्यांचा उत्साह अगदी उतू जात होता. रोहन पण ग्राऊंडवर निघाला. महेश त्याला म्हणाला, “ए टिंग्या, तू पण येतोयस? बास्केट उंच असते बरं का?” महेशसकट सगळी मुलं जोरजोरात हसायला लागली. रोहनचे कान लाल झाले. संघात त्याची निवड काही झाली नाही. खरंतर त्याला बास्केटबॉल खूप आवडायचा. पण वर्गातल्या दांडग्या मुलांपुढे त्याचं काही चालायचं नाही. त्यांच्यासमोर तो अगदी लहानखुरा दिसायचा. ‘कधी वाढणार आपली उंची? की असेच राहणार आपण? दादा केवढा ताडमाड आहे, मग मी का नाही? वर्गातल्या मुलीसुद्धा आपल्याला भाव देत नाहीत...’
वर्गातल्या मुली तर केव्हाच उंच झाल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी त्या मुलांपेक्षाही उंच दिसायच्या. पण यावर्षी चित्र पालटलं होतं.
हेही वाचा!
आपली जनुकं, ठेवण, आहार, व्यायाम, वातावरण या सगळ्यांचा सहभाग असतो या वाढीमधे.
तुम्ही म्हणाल, जनुकांमधे काय असेल हे आमच्या हातात कुठे आहे?
बरोबर आहे, ते तुमच्या हातात नाही. पण चांगलं पौष्टिक खाणं, भरपूर खेळणं, जंक फूड कमी खाणं हे तर आपल्या हातात आहे? कारण आपली उंची वाढायची तर आपली हाडं, स्नायू अशा सगळ्या पेशी वाढायला हव्यात. त्या तयार होण्यासाठी कच्चा माल नको का? म्हणजेच भरपूर प्रथिनं किंवा प्रोटीन्स, कॅल्शियमसारखे क्षार, ड जीवनसत्त्वासारखी विटामिन्स आणि कॅलरीज हव्यात त्यासाठी. खेळातून, व्यायामातून त्यांचा नीट वापर व्हायला हवा. नुसती जनुकं आणि क्षमता असून काय उपयोग?

Image: dietburrp
हेही वाचा!

Image: theindusparent
तुम्हाला माहितेय का?
हेही वाचा!
मग रोहनची उंची का बरं वाढली नसेल? त्याचं कारण म्हणजे आपण सगळे, मुलं काय आणि मुली काय; अगदी युनिक, खास आहोत. आपण काही कारखान्यातून बाहेर पडणारी खेळणी नव्हेत एकाच वेळी, एकसारखेच दिसायला! उंची वाढण्याची सुरुवात प्रत्येक मुलात वेगवेगळ्या वेळी होते. त्यामुळे रोहनला थोडा धीर धरायला हवा, थोडी वाट बघायला हवी. फार टेन्शन आलं तर डॉक्टरांना दाखवायला हवं.
https://urjaa.online/how-to-become-strong-in-adolcent-age/
(लेखिका बालरोगतज्ज्ञ असून किशोरवयीन मुलांविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.)
vrdesh06@gmail.com
आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा... तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact