शाळेत जाणाऱ्या मुलाने शोधला कॅन्सरशी लढणारा साबण!

Image: ndtv

कॅन्सर या आजाराविषयी तुम्ही नक्कीच ऐकलं असेल ना. या आजारावरील उपचारांसाठी अभ्यासक, संशोधक सतत संशोधन करुन नवीन नवीन उपचार आणि औषधं शोधत असतात. पूर्वीच्या तुलनेत कॅन्सरवर आता अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळेच कॅन्सरच्या आजारातून रुग्ण मोठ्या प्रमाणात बरे होत आहेत. कॅन्सरवरील उपचार संशोधनात मुलंही मागे नाहीत हे हेमन बेकेले या १४ वर्षांच्या मुलाने दाखवून दिलं आहे. हेमन याने त्वचेच्या कॅन्सरवर उपचार करणारा मेलानोमा ट्रीटींग सोप (एमटीएस) साबण तयार केला आहे.

शाळेत जाणाऱ्या हेमनचं संशोधन

हेमन बेकेले हा अमेरिकेतील वर्जिनिया राज्यातील अन्नानडेल येथील डब्ल्यू टी वूडसन हायस्कूल येथे नवव्या ग्रेडमध्ये शिकतो. १४ वर्षांच्या हेमनला 'अमेरिकाज टाॅप यंग सांयटिस्ट' हा पुरस्कार मिळाला.त्याने त्वचेच्या कॅन्सरवर नाविन्यपूर्ण असा मेलानोमा ट्रीटींग सोपचा शोध लावला. त्या शोधासाठीच हेमनला हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराच्या स्वरूपात हेमनला २५००० डॉलर्स रोख मिळाले आहेत. 

३ एम यंग सायटिंस्ट चॅलेंजमध्ये हेमनने भाग घेतला होता. या स्पर्धेत स्पर्धकांना आपल्या आजूबाजूच्या प्रश्नांवर, समस्यांवर  नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यास सांगितले होते. अंतिम दहा जणांमध्ये हेमनची निवड झाली होती. गेल्या चार महिन्यांपासून हेमन आपल्या संशोधनावर काम करत होता.  

हेमन हा आधी इथिओपिया येथे राहात होता. तिथे तो नेहमी लोकं भर उन्हात, आग ओकणाऱ्या दुपारी चटका सोसत कामं करायची. त्याचा परिणाम म्हणून अनेक लोकांना त्वचेचा कर्करोग म्हणजे स्किन कॅन्सर झालेला. पण ही समस्या केवळ इथिओपियाचीच नव्हती. तो जेव्हा अमेरिकेत आला तेव्हा तिथे देखील स्किन कॅन्सर झालेले बरेच रुग्ण असल्याचे त्याला कळले. त्यावर काय करता येईल हा विचार त्याच्या डोक्यात सुरु होताच. त्यातच त्याने ३एम यंग सायंटिस्ट चॅलेंज या स्पर्धेत भाग घेतला. आपल्य आजूबाजूच्या समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याचं आव्हान स्वीकारल्यानंतर हेमनला स्किन कॅन्सर या समस्येवर काम करावंसं वाटलं आणि त्याने त्याचा अभ्यास आणि संशोधन सुरु केलं

हेही वाचा!

हेमन याने त्वचेच्या कॅन्सरशी लढू शकणारा असा विविध रासायनिक संयुगानी बनणारा मेलानोमा ट्रीटिंग सोप तयार केला. हे संशोधन करताना त्याने संगणकाचा आधार घेतला. संगणकातील डाटाने साबणातील रासायनिक संयुगं एकत्र कसे काम करतात, काय परिणाम दाखवतात याचे निष्कर्ष हेमनला तपासता आले. त्यातून त्याने त्वचेच्या कर्करोगाशी लढा देवू शकेल असा साबण तयार केला.

हेमन याने तयार केलेल्या साबणाचे सूक्ष्म कण शरीराच्या प्रतिकार क्षमतेला सक्रिय करुन त्वचेच्या कॅन्सरशी लढण्यास तयार करतील. कम्प्युटरवर या साबणाच्या परिणामाचे चांगले निष्कर्ष मिळाले. अजूनपर्यंत हेमन याने माणसांवर या साबणाची चाचणी घेतली नाही. पुढे हेमन याला या संशोधनावर आणखी काम करुन ही साबण सामान्य माणसालाही परवडेल एवढा किफायतशीर बनवायचा आहे.मेलानोमा ट्रीटींग सोपची किंमत सध्या १० डाॅलर्स इतकी आहे. हेमेन याला १० डाॅलर्सपेक्षाही कमी किंमतीला हा साबण उपलब्ध करुन द्यायचा आहे.

मेलानोमा स्किन कॅन्सर म्हणजे?

मेलानोमा हा एक प्रकारचा त्वचेचा कॅन्सर आहे. जेव्हा मेलानोसाइट्स नावाच्या पेशी नियंत्रणाच्या बाहेर वाढतात तेव्हा हा आजार होतो. मेलानोसाइट्स या त्वचेला तपकिरी किंवा बदामी रंग देणाऱ्या पेशी आहेत. या पेशींच्या वाढीकडे दुर्लक्ष झाल्यास किंवा त्यावर उपचार न झाल्यास हा कॅन्सर शरीराच्या इतर भागातही पसरतो.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact