शहराची तब्येत बिघडलीये.. एक दिवस गाडी वापरली नाही तर!

 Image:  nowjakarta

आपण घराबाहेर पडतो. रस्त्यावर चालू लागतो तेव्हा आपल्याला काय अनुभव येतो? जिकडे तिकडे आपल्याला गाड्याच गाड्या दिसतात. कार, बाइक्स, बस, टॅक्सी, रिक्षा.. रस्त्यावर अखंड वाहतूक सुरुच असते. या पळणाऱ्या गाड्यांकडे पाहून वाटतं की एखादा दिवस किंवा दिवसातले काही तास जर रस्त्यावर एकही गाडी पळाली नाही तर? पण हे कसं शक्य आहे असं आपलं आपणच उत्तर देवून मोकळे होतो. पण जी गोष्ट आपल्याला अशक्य वाटते ती गोष्ट जगात एका ठिकाणी घडते आहे. ते ठिकाण म्हणजे जकार्ता. इंडोनेशियाची राजधानी. या शहरात एक वेगळाच उपक्रम दर रविवारी राबवला जातो. हा उपक्रम म्हणजे ' कार फ्री डे' . दर रविवारी विशिष्ट काळ जकार्तामध्ये कुठेही रस्त्यावर कोणतीही गाडी चालवली जात नाही. आपल्या शहराचं बिघडलेलं आरोग्य थोडं तरी सुधारण्यासाठी जकार्ता शहरानं हा कार फ्री डे उपक्रम राबवायचं ठरवलं.

हेही वाचा!

जकार्ताचा कार फ्री डे उपक्रम

सर्वच शहरी भागात वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील हवा प्रदूषित होत आहे. ट्रॅफिकजाम , रस्ते अपघात या समस्या वाढल्या आहेत. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी काही पर्याय दिसतोय का हे शोधण्यासाठी जकार्तामध्ये ' कार फ्री डे' हा उपक्रम दर रविवारी राबवला जातो.

कार, बाइक्स यामुळे आपलं जगणं खूप सोप्पं झालंय. पण यामुळे आपल्या आयुष्यात समस्याही निर्माण झाल्या आहेत. जीवघेणे धोकेही आपल्यासमोर उभे ठाकले आहेत. हे टाळून आपलं जगणं सुरक्षित करण्यासाठी कार चालवणं, बाइक्स वापरणं हाच एकमेव पर्याय नाही हे सांगणं आणि गाड्यांद्वारे होणारं कार्बन उत्सर्जन कमी करणं हे या उपक्रमाचे मुख्य उद्देश आहेत.

जकार्ता शहरात वाढलेली वाहनांची संख्या, वायू प्रदूषण बघता काहीतरी मार्ग काढावा या उद्देशाने २००७ मध्ये ' कार फ्री डे' या उपक्रमाचा जन्म झाला. प्रायोगिक स्वरुपत जालन सुदिरमन आणि जालन थामरिन या दोन शहरात तो राबवला गेला. लोकांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला. तेव्हापासून आजपर्यंत जकार्ता येथे हा उपक्रम लोकांच्या जगण्याचा एक भाग झाल आहे. या एका छोट्या उपक्रमामुळे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारायला मदत होते आहे.

हेही वाचा!

दर रविवारी सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत जकार्तामध्ये रस्त्यावर दुचाकी, चारचाकी गाड्या चालवल्या जात नाही.

या काळात लोकांना पायी फिरण्यासाठी, सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. येथील नागरिकही या काळात बाहेर पायी फिरायला जातात. सायकल चालवतात. ज्यांच्याकडे सायकल नाही ते भाड्याने सायकल घेऊन चालवतात.

जकार्तामध्ये दर रविवारी कार फ्री डे हा उपक्रम साजरा होत असताना रस्त्यावर कलाकार, कलाकारांचा समूह गाणी, नाटकं सादर करतात. व्यायामाचे प्रकार शिकवले जातात. एरवी जो रस्ता फक्त धावणाऱ्या गाड्यांचा असतो, त्या रस्त्यावर स्थानिक आणि पौष्टिक पदार्थांचे स्टाॅल्स लावले जातात.

Image: diskominfo

Image: liputan6.com

कार फ्री डे या उपक्रमामुळे रस्त्यावर रविवारी विशिष्ट वेळ अजिबातच वाहतूक नसल्याने घरातील पाळीव प्राण्यांना घेवून लोकं रस्त्यावर चालतात. मोकळ्या रस्त्यांवर चालताना प्राण्यांनाही मजा येते.

पर्यावरणाच्यादृष्टीने जागरुकता वाढवण्यासाठी पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्था विविध कार्यक्रम या काळात आयोजित करतात.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact