
Image:wikipedia
अवकाशातल्या स्पेस स्टेशनबद्दल आपल्याला नेहेमीच कुतुहल वाटतं. अवकाशात तरंगत असणारं स्पेस स्टेशन खाली पृथ्वीवर कधीच पडत नाही. हे कसं? असा प्रश्न नेहेमी पडतो. काय असावं बरं याचं उत्तर? यामागे कुठलं मॅजिक नसून विज्ञान आहे. अमेरिकेची स्पेस एजन्सी 'नासा'च्या नेतृत्वाखाली जगातील अनेक स्पेस एजन्सी आल्या आणि त्यांनी १९९८ मध्ये अवकाशात एक स्पेस स्टेशन बनवण्याची मोहीम सुरु केली. अमेरिका, रशिया, जपान, युरोपसह १५ देशांच्या अंतराळ संस्थांनी मिळून स्पेस स्टेशनची स्थापना केली आहे. रशियाच्या एका राॅकेटच्या सहाय्याने स्पेस स्टेशनचे सुरुवातीचे भाग पाठवले गेले. नंतर वेगवेगळे भाग अवकाशात पोहोचले. हे सर्व भाग जोडून नंतर स्पेश स्टेशन तयार करण्यात आलं. नोव्हेंबर २००० पर्यंत स्पेस स्टेशन तयार करण्याचं काम पूर्ण करण्यात आलं. यालाच 'इंटरनॅशनल स्पेस स्टेशन' म्हणून ओळखलं जातं.
या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये शास्त्रज्ञांच्या राहण्याची, आराम करण्याची, काम करण्याची, अवकाशातल्या गोष्टींवर अभ्यास आणि संशोधन करण्याची व्यवस्था आहे. हे स्पेस स्टेशन एका मोठ्या ५ बीएचके फ्लॅटप्रमाणे आतून मोठं आहे. बाहेरुन हे स्पेस स्टेशन एका फुटबाॅलच्या मैदानासारखं भासतं. अवाढव्य आकाराचे हे स्पेस स्टेशन पृथ्वीवरुन चमचमत्या, फिरत्या चांदणीप्रमाणे दिसते. या स्पेस स्टेशनमध्ये एका वेळी ६ जण व्यवस्थित राहू शकतात आणि काम करु शकतात. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे जगातल्या कोण्या एका देशाच्या मालकीचं नाही. या स्पेस स्टेशनची स्थापना अनेक देशांच्या अवकाश संस्थांनी मिळून केली आहे. आतापर्यंत जगात केवळ चीनने स्वत:चं स्पेस स्टेशन तयार केलं आहे. यापुढील काळात भारतही आपलं स्पेस स्टेशन उभारण्यासाठी प्रयत्न करत आहे.
हेही वाचा!
स्पेस स्टेशन खाली पडत नाही कारण..

Image: siasat.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact