बदलत्या फॅशनप्रमणे अपटूडेट राहिलं तर त्रास होतो. पण कोणाला?

-शिवान दर्डा

Image: freepik.

जॉर्डन्सचे नवीन आलेले शूज असू देत नाही तर स्टॅन स्मिथ्सची लिमिटेड एडिशन… बाजारात जे काही नवीन येईल ते सगळं आपल्याला पाहिजे असतं. मीपण असे उगाच काही जोड घेतले असतीलच. पण मग मला वाटलं,”इतके सगळे बूट चपला घेणं आपल्याला परवडतं, पण आपल्या पृथ्वीला ते परवडणार आहे का?” अभ्यास असं सांगतो, की कपड्यांची फॅशन आणि बूट चपलांचे जोड हे वातावरणाचं सगळ्यात जास्त नुकसान करणाऱ्या घटकांपैकी दोन आहेत. या दोन्हीमुळे प्रचंड प्रमाणात कचरा, कार्बनडायऑक्साईडचं उत्सर्जन आणि जलप्रदूषण होतं.

स्पोर्ट्स शूज बनवतांना रबर, फोम आणि प्लॅस्टिकसारखी पेट्रोलियम उत्पादनं वापरली जातात. कुठल्याही प्रकारची पेट्रोलियम उत्पादनं तयार करतांना हरितगृह वायू आणि इतर प्रदूषण करणारे घटक हवेत सोडले जातात. त्याशिवाय या सर्व उत्पादनांची साठवणूक आणि वाहतूक करण्यातही मोठ्या प्रमाणात कार्बनडायऑक्साईड वायूचं उत्सर्जन होतं. जगात सगळ्यात जास्त पाणी वापरणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे.

हेही वाचा! 

जगात लोक वर्षाकाठी सरासरी ३५ ते ४० किलो कपडे टाकून देतात, त्यापैकी फक्त १५ टक्के कपडे कोणालातरी दिले जातात किंवा त्यांचा पुनर्वापर केला जातो. उरलेले सगळे कपडे हे कचऱ्याच्या ढिगात टाकले जातात किंवा चक्क जाळून टाकले जातात. आणि यापैकी काहीही केलं तरी त्यातून धोकादायक रसायनं आणि वायूंचं उत्सर्जन हे होतंच.

 बीबीसीने तयार केलेल्या हा खतरनाक व्हिडीओ बघा.

जबाबदार वापरकर्ते म्हणून आपण काय करू शकतो?

आपल्या पृथ्वीला दरवर्षी दर माणसामागे ५ पेक्षा अधिक कपडे परवडू शकत नाहीत. त्यामुळे आपण त्याबाबतीत योग्य त्या उपाययोजना वेळीच केल्या पाहिजेत.

वस्तू विकत घेतानाच जास्त टिकणाऱ्या चांगल्या दर्जाच्या वस्तू विकत घ्या.

सेंद्रिय कापूस किंवा रिसायकल केलेलं पॉलिएस्टर यासारख्या पर्यावरणस्नेही कच्च्या मालापासून बनवलेल्या वस्तू शोधा.

नवीन वस्तू घेण्याऐवजी आहे ती वस्तू थोडीफार दुरुस्त करून वापरता येते का ते बघा.काही वेळा थोड्याफार वापरलेल्या वस्तूंमध्येही छान वस्तू मिळू शकतात.

सगळ्यात महत्वाचं, पृथ्वीची काळजी घेणं याइतकं फॅशनेबल काहीही नाही हे लक्षात असू द्या.

Image: freepik.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact