इस्त्रायल देशात उत्साहात साजरा केला जाणारा योम किप्पूर काय आहे?

Image: kslnewsradio

सध्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर तुम्ही कोणती बातमी वाचताय? युध्दाची. इस्त्रायल आणि हमास यांच्यात ८ ऑक्टोबरपासून युध्द सुरु झालं. हमासने इस्त्रायलवर ८ ऑक्टोबरला दहशतवादी हल्ला केला. त्या दिवशी इस्त्रायलमध्ये लोकांना 'योम किप्पूर'ची सुटी होती. तुम्ही हे वाचलं का? या युध्दाची बातमी वाचताना हे योम किप्पूर काय आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल ना? योम किप्पूर म्हणजे ज्यूंचा पवित्र सुटीचा दिवस मानला जातो. योम किप्पूर म्हणजे प्रायश्चित्ताचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

हेही वाचा!

योम किप्पूर म्हणजे काय?

योम किप्पूर ज्यू कॅलेंडरनुसार तिशरी महिन्याच्या १० व्या दिवशी साजरा केला जातो. साधारणत: सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये येतो. रोश हनाह या ज्यूंच्या नवीन वर्षाच्या उत्सवानंतर १० दिवसांनी योम किप्पूर साजरा केला जातो. रोश हनाह आणि योम किप्पूर या दोन सुट्यांच्या मधला कालावधी पश्चाताप आणि आत्मचिंतनाचा असतो. या कालावधीत ज्यू लोकं त्यांनी केलेल्या चुका पापं यांची कबुली देतात आणि देवाकडे क्षमा मागतात. हा काळ म्हणजे इतरांसोबतचे नाते सुधारण्याचा, इतरांशी असलेलं भांडण मिटवण्याचा दिवस असतो.

बायबलनुसार् सिनाई पर्वतावर तोराह हा पवित्र धर्मग्रंथ मिळाल्यानंतर ४० दिवसांनी ज्यू लोकांचा देवाने निवडलेल्या लोकांमध्ये समावेश झाला. ४० दिवस ज्यू लोकांनी सोन्याच्या बकरीच्या पिल्लाची पुजा केली  हे पाप समजलं गेलं. योम किप्पूर म्हणजे तो दिवस जेव्हा देवाने ज्यूंच्या या पापाला क्षमा केलं. माॅशे या प्रेषिताने देवाकडे या लोकांचा नाश करु नको म्हणून विनवणी केली. देवाने मग या ज्यू लोकांना माफ केलं. हा दिवस तिशरीचा दहावा दिवस होता.

परंपरेनुसार प्रायश्चित्ताच्या दिवशी ज्यू लोकं बकऱ्याला पाप धारण केल्याचं प्रतीक म्हणून वाळवंटात सोडून दिलं जातं. बळीचा बकरा ही म्हण यानंतरच प्रचलित झाली असावी. म्हणजे निष्पाप, निर्दोषांना इतरांच्या चुकांसाठी दोष दिला जातो. इतरांच्या चुकांसाठी निर्दोषाला पापी समजलं जातं.योम किप्पूर म्हणजे चुकांचं , पापांचं परिमार्जन करणं, देवाशी जोडलं जाणं, त्याग करणं असं मानलं जातं.

योम किप्पूर या दिवशी उपवास केला जातो. हा उपवास योम किप्पूरच्या आदल्या दिवशी सूर्यास्त झाल्यावर सुरु होतो. हा उपवास २५ तासांचा असतो. या दिवशी चिंतन, मनन केलं जात्ं. स्वत:चे लाड पुरवणाऱ्या कोणत्याही गोष्टी केल्या जात नाही. पांढरे कपडे घातले जातात. योम किप्पूरच्या आदल्या दिवशी दोन वेळा जेवण केलं जातं. यात हनी केकला खूप महत्व असतं. सूर्यास्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा सूर्यास्त होईपर्यंत काहीही खाल्लं-पिलं जात नाही. दुसऱ्या दिवशी सूर्यास्त झाल्यानंतर मेंढ्याचे शिंग फुंकून उपवास संपल्याचं जाहीर केलं जातं. मग संध्याकाळी लोकं एकत्र जमतात आणि नाश्ता करतात. असा असतो योम किप्पूर . 

Image: brandeis.edu

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact