डायपरच घर.. शास्त्रज्ञांनी शोधला प्रदूषण कमी करण्याचा उपाय

Image: news18.

डायपर... अरे असं ईईईईईई काय म्हणताय? नाक कशाला दाबताय? तुम्हालाही लहापणी डायपरच लावले होते ना आई-बाबांनी. तर मी आज डायपरचा विषय काढला तो एका खास प्रयोगाबद्दल सांगायला. वापरलेल्या डायपरवर एक भन्नाट प्रयोग करण्यात आलाय. डायपरचा वापर करुन चक्क घर बांधण्यात आलंय. वाटलं ना कुतुहल. कोणी केलं ? का केलं? याबद्दल. बांधकाम करण्यासाठी काॅंक्रिट वापरलं जातं, हे तर आपल्याला माहीतीच आहे. सिमेंट, वाळू आणि पाणी यांच्या मिश्रणानं तयार होणाऱ्या या क्राॅक्रिटचा उपयोग घरं, इमारती आणि रस्ते बांधणीसाठी केला जातो. तर जपानमधील 'किटाक्युशू विद्यापिठा'तील शास्त्रज्ञांनी काॅंक्रिटमध्ये वाळूऐवजी कचऱ्यात पडलेल्या, वापरलेल्या डायपरचा उपयोग केला. वापरलेले आणि कचऱ्यात पडून राहाणारे डायपर हे प्रदूषणाचा प्रश्न मोठा करत आहे. या प्रश्नावर उपाय म्हणून हे डायपर अशा पध्दतीने बांधकामात उपयोगी पडू शकतात का? हे बघण्यासाठीच जपानमधील शास्त्रज्ञांनी हा डायपरवरचा विशिष्ट प्रयोग केला आहे.

 हेही वाचा!

डायपरचं प्रदूषण.. ते किती?

वापरलेल्या डायपरची विल्हेवाट योग्य पध्दतीने लागत नसल्याने जगभरातील प्रदूषण वाढत आहे. एकट्या अमेरिकेत वापरुन फेकलेल्या डायपरमुळे ३६० कोटी किलोग्रॅम वजनाचा कचरा निर्माण होतो. हा डायपरचा कचरा डेपोमध्ये तसाच पडून राहातो. यामुळे प्रदूषणाचा प्रश्न वाढतो. तसंच इतर देशांमध्ये वापरुन फेकलेले डायपर नद्या, खाड्या यात जावून मिसळतात.२०१८ मध्ये इंडोनेशियामध्ये झालेले एक संशोधन सांगतं की इंडोनेशियातील १५ शहरातील पाण्याच्या मार्गात २० टक्के कचरा हा वापरलेल्या डायपरचा होता.

वापरलेले डायपर हे जसे प्रदूषण निर्माण करतात तसाच वाळूचा वापर यामुळेही पर्यावरणाशी निगडित समस्या निर्माण होतात. वाळू एकतर नदीमधून उपसली जाते किंवा खाणी खणून काढली जाते. या दोन्ही पध्दतींमुळे पर्यावरणाचं नुकसान होतंच. यावरचा उपाय म्हणून शास्त्रज्ञांना वापरलेल्या डायपरचा उपयोग बांधकामात करुन वाळूचा उपयोग कमी करणं हा योग्य पर्याय वाटतो, त्यासाठीच त्यांनी हा प्रयोग केला आहे.

शास्त्रज्ञांनी आधी कचऱ्यात पडलेले डायपर गोळा करुन आणले. आधी हे डायपर स्वच्छ केले. विशिष्ट रसायनं वापरुन या हे डायपर निर्जंतूक केले. त्यानंतर हे डायपर चांगले वाळवून घेतले. वाळलेल्या आणि निर्जंतूक झालेल्या डायपरचे बारीक तुकडे केले. हे अशा पध्दतीने डायपरचे तुकडे मिसळून केलेले काॅंक्रिट हे नेहमीच्या काॅंक्रिट इतकेच सुरक्षित आणि मजबूत असल्याचं शास्त्रज्ञांना आढळलं. तसेच शास्त्रज्ञांना यात घातक विषाणूही आढळले नाही. घर बांधतांना सिमेंट, पाणी यासोबत जितकी वाळू लागते त्या एकूण गरजेच्या आठ टक्के वाळूचा वापर कमी करुन त्याऐवजी डायपरचा वापर करता येवू शकतो. यामुळे वाळू मिळवण्याच्या प्रयत्नातून होणारी हानी आणि कचऱ्यातील डायपरमुळे होणारे प्रदूषण असे दोन्ही प्रश्न सुटु शकतातत असं डायपरवर प्रयोग करणारे शास्त्रज्ञ सांगतात.    

Image: .thehindu

 हेही वाचा!

 Image: gizmodo


डायपरचे घर 

डायपरचा उपयोग करुन बांधकामासाठीचं काॅंक्रिट किती मजबूत होतं एवढंच शास्त्रज्ञांनी प्रयोगादरम्यान पाहिलं नाही तर त्यांनी डायपर मिश्र्रित काॅक्रिटचा उपयोग करुन घरही बांधलं. त्यात त्यांना लक्षात आलं की डायपरचा वापर काॅक्रिटमध्ये केल्यास घर बांधण्याचा खर्च केमी होवू शकतो. कारण वाळूसाठी पैसे कमी मोजावे लागतात. वापरलेले डायपर तर कचऱ्यात मोफत मिळतातच आणि त्यांची कमतरताही भासत नाही.

आपण केलेल्या प्रयोगाला जर जगभरातून प्रतिसाद मिळाला तर वापरलेले डायपर सुरक्षितरित्या कसे गोळा करायचे? ते साफ करुन कसे साठवायचे या प्रश्नांवरही काम करावं लागेल असं जपानमधील शास्त्रज्ञांना वाटतं. सोबतच क्राॅंक्रिटमध्ये डायपर मिसळून त्याचा उपयोग घर बांधताना करताना उष्णता, आवाज यांना कसे रोखू शकतो यावरही शास्रज्ञांचा अभ्यास सुरु आहे. पण मुख्य मुद्दा आहे तो लोकांचं वाळूचा वापर कमी करुन काॅंक्रिटमध्ये डायपरचा उपयोग करण्यासाठी मन वळवण्याचा. शास्रज्ञांना हे मोठं आव्हान वाटत आहे. पण तुम्ही सांगा तुम्हाला आवडेल का असं पर्यावरणाची मदत करणारं डायपरचं घर?

काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! -कसं कळवणार?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact