१३ शाळांना ८ लाख रुपये

हे काय आहे?

१. ही स्पर्धा नाही.

२. मुलांमध्ये वन्यप्राणी आणि पर्यावरणविषयक जाणीव वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या प्रयोगशील शाळा आणि शिक्षकांचा हा शोध आहे.

आठ लाख रुपयांची बक्षिसे कुणाला मिळतील?

१. या प्रकल्पांतर्गत एकूण तेरा शाळा निवडल्या जातील.

२. रुपये १,२५,०००, रुपये १,००,००० आणि रुपये ७५,००० अशा रकमेची बक्षिसे पहिल्या तीन शाळांना मिळतील

३. त्यानंतरच्या दहा शाळांना प्रत्येकी ५०,००० रुपयांची बक्षिसे मिळतील.

४. पर्यावरणविषयक विशेष प्रकल्प राबवणाऱ्या शाळा या योजनेत सहभागी होऊ शकतात

५. एखादी शाळा, शिक्षक यांना मुलांसाठी काही विशेष प्रकल्प सुरु करायची इच्छा आहे,

पण अजून काम सुरु केलेले नाही, अशा शाळाही आपल्या कल्पना पाठवू शकतात.

या योजनेत सहभागासाठी शाळांनी काय करायचे ?

१. सोबत एक गुगल फॉर्म दिला आहे. त्या लिंकवर क्लिक करा

२. ऑनलाईन फॉर्म पूर्ण भरा . तो इंग्रजी अगर मराठीत भरता येईल

३. मराठीत भरायचा असल्यास मजकूर दुसरीकडे टाईप करून तिथे तो कॉपी करून घेऊन या फॉर्मवर पेस्ट करता येईल

४. दिलेली शब्दमर्यादा पाळणे अत्यावश्यक आहे.

५. पूर्ण भरलेला फॉर्म सबमिट करा

६. फॉर्म भरण्याची शेवटची मुदत - दिनांक २५ फेब्रुवारी २०२५

अधिक माहितीसाठी संपर्क

ईमेल : urjaa.online@gmail.com

व्हॉटसअँप / फोन : 9112050500