निसर्गाचा तोल सुटलाय,निसर्ग बदलतोय म्हणजे नक्की काय होतंय?

हवामान बदलामुळे आपल्या पृथ्वीसमोर अस्तितत्वाची म्हणजे जगण्या मरण्याची भीती निर्माण झाली आहे. या हवामान बदलामुळे आपल्याला जगवणारा निसर्ग मोठ्या प्रमाणात बदलतोय. निसर्गच बदलतोय म्हटल्यावर निसर्गावर अवलंबून असलेलं मानवाचं, प्राण्यांचं, किटकांचं आणि लाखो प्रकारच्या जीवांचं जगणंच धोक्यात आलं आहे.

निसर्ग बदलतोय म्हणजे काय होतंय?

पृथ्वीच्या सरासरी तापमानात वाढ झाली आहे. हवामान बदलामुळे जागतिक सरासरी तापमान वाढलं आहे. प्रत्येक उन्हाळ्यात तापमानात होणारी वाढ अनुभवण्यास येत आहे. प्रत्येक वर्षी यंदाचा उन्हाळा मागच्या वर्षीपेक्षा जास्तच तापदायक असल्याचं चित्रं निर्माण होत आहे.

वाढलेल्या तापमानामुळे हवेतून पाण्याचं बाष्पीभवन होणाचं प्रमाण वाढलं आहे. त्याचा परिणाम म्हणजे जगभरात अनेक ठिकाणी भयानक दुष्काळ पडत आहे. पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होत आहे. तापमान वाढीमुळे जंगलात त्रासदायक किटकांचा प्रार्दुभाव वाढला आहे. जमिनीवरील आणि जमिनीखालील पाण्याचे स्त्रोत आटत चालले आहे. त्याचा परिणाम म्हणून शेती, पिकं सुकत आहे. माती अधिक कोरडी होत आहे.

 Image earthobservatory

हेही वाचा! 

कोरड्या आणि उष्ण हवामानामुळे उन्हाळ्यात जंगलात वणवे लागण्याचं प्रमाण वाढत आहे. हे वणवे मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. अमेरिका, कॅलिफोर्निया येथे जंगलांना लागणाऱ्या वणव्यांचं प्रमाण १९८४ पासून दुप्पट झालं आहे असं अभ्यासक सांगतात. 

तापमान वाढीमुळे गरम हवा जास्त बाष्प धरुन ठेवते. त्यामुळे उष्णकटिबंधीय प्रदेशात तीव्र चक्रीवादळं येत आहे. जागतिक तापमान जसं वाढत जात आहे, त्यामुळे पावसाळ्यात एकाच वेळी भरपूर पाऊस पडण्याच्या घटना, त्यामुळे येणारे हानिकारक पूर यांचं प्रमाण वाढलं आहे.

हवामान बदलामुळे ध्रुवीय बर्फाळ प्रदेशापासून उष्णकटिबंधीय प्रदेशापर्यंत सर्व ठिकाणची पर्यावरणीय परिसंस्था विस्कळीत झाली आहे. तापमानात थोडा जरी बदल झाला तरी त्याचा परिणाम अन्न आणि पर्यावरणावर होताना दिसत आहे.

हवामान बदलामुळे ध्रुवीय बर्फाळ प्रदेशापासून उष्णकटिबंधीय प्रदेशापर्यंत सर्व ठिकाणची पर्यावरणीय परिसंस्था विस्कळीत झाली आहे. तापमानात थोडा जरी बदल झाला तरी त्याचा परिणाम अन्न आणि पर्यावरणावर होताना दिसत आहे.

हवामान बदलाचा ठळक परिणाम ध्रुवीय बर्फाळ प्रदेशात दिसतो आहे. इतर कुठल्याही भागापेक्षा आर्क्टिक प्रदेश दुप्पट वेगाने गरम होत आहे. त्यामुळे तेथील बर्फाच्या लाद्या, हिमनद्या वितळत आहेत.

 Image:cloudfront.net

तापमान वाढत जाण्यामुळे हिमनद्या वितळत आहेत. वितळणाऱ्या हिमनद्यांमुळे आणि गरम तापमानामुळे समुद्राचं पाणी वाढत आहे, पसरत आहे आणि गरम होत आहे. वातावरणातील ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण जर वाढतंच गेलं तर या शतकाच्या अखेरपर्यंत जगातील समुद्र किनाऱ्यावरील मोठी शहरं बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. समुद्राची पातळी हळूहळू वाढतच असल्यामुळे रस्ते, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, वीज निर्मिती प्रकल्प यावर विपरित परिणाम होत आहेत. समुद्र किनारे छोटे होत आहेत. पिण्याच्या पाण्यात समुद्राचं पाणी मिसळून ते क्षारयुक्त होत आहे. त्याचा मोठा परिणाम शेतीसाठी आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्यावर होत आहे.

तापमान वाढीचा मोठा परिणाम समुद्राला सहन करावा लागत आहे. पृथ्वीचा ७० टक्के भूभाग हा समुद्राने व्यापला आहे. ग्रीन हाऊस गॅसेसने पकडून ठेवलेल्या एकूण उष्णतेपैकी ९३ टक्के उष्णता समुद्र शोषतात. तसेच जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून वातावरणात तयार होणाऱ्या कार्बन डाय ऑक्साइडपैकी ३० टक्के कार्बन डाय ऑक्साइड समुद्राद्वारे शोषला जात आहे.  हवामान बदलामुळे समुद्रात उष्ण लाटा येण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं अभ्यासातून दिसून आलं  आहे. हवामान बदलामुळे निसर्ग असा सर्वांगानं बदलत आहे. निसर्गात होणारे हे बदल सगळ्यांचीच  चिंता वाढवणारेच आहेत.

काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! -कसं कळवणार?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact