परीक्षा आहे तर टीव्ही बंद! आई-बाबा हा रुल का लावतात?

Image: freepik

हाय ऊर्जा,

आई म्हणते की आता परीक्षा जवळ आली आहे तर आता टीव्ही बंद. आता फक्त अभ्यास करायचा. पण असं का?

परीक्षा जवळ आल्या की आईबाबा पहिली शिकार करतात ती आपल्या युट्यूबची आणि टीव्हीची! परीक्षा जवळ आल्या की त्यांना लग्गेच आपला स्क्रीन टाइम टोचायला लागतो. “आधी तो टीव्ही बंद कर आणि अभ्यासाला बस!” रोज संध्याकाळी तेच ते! अरे काय आहे हे… परीक्षाच आहेत ना? मग ठीक आहे ना. एवढे पॅनिक कशाला होतात आईबाबा त्यावरून? आणि टीव्ही कशाला बंद करायचा? काही जणांच्या घरी तर चॅनल्सचे पैसे भरत नाहीत. वायफाय बंद करून ठेवतात. पण का?

हेही वाचा!

परीक्षा जवळ आल्या की आईबाबा पहिली शिकार करतात ती आपल्या युट्यूबची आणि टीव्हीची! परीक्षा जवळ आल्या की त्यांना लग्गेच आपला स्क्रीन टाइम टोचायला लागतो. “आधी तो टीव्ही बंद कर आणि अभ्यासाला बस!” रोज संध्याकाळी तेच ते! अरे काय आहे हे… परीक्षाच आहेत ना? मग ठीक आहे ना. एवढे पॅनिक कशाला होतात आईबाबा त्यावरून? आणि टीव्ही कशाला बंद करायचा? काही जणांच्या घरी तर चॅनल्सचे पैसे भरत नाहीत. वायफाय बंद करून ठेवतात. पण का?

थोडासा वेळ टीव्ही बघितला तर एवढा काय प्रॉब्लेम होतो? तर… थोडा वेळ टीव्ही बघितल्याने काही होत नाही. पण आपण काय थोडा वेळ टीव्ही बघतो का? “अर्धाच तास” म्हणून आपण एकदा टीव्ही सुरु केला की मग ‘अजून एक गाणं’, ‘एवढाच एपिसोड’ असं करत करत आपण खूप वेळ टीव्ही बघतो आणि मग अर्थातच आपला अभ्यास राहून जातो. म्हणून परीक्षा जवळ आली की आईबाबा टीव्ही बंद करा म्हणून ओरडतात.

Image: freepik

त्यातही वार्षिक परीक्षा म्हणजे वर्षभर केलेल्या अभ्यासाची परीक्षा असते. त्यात मुलांनी टीव्ही बघत वेळ वाया घालवू नये असं आईबाबांचं म्हणणं असतं. आणि असेही हे दिवस असतात किती? जेमतेम तीन ते चार आठवडे. टीव्ही बघितला नाही तर काय बिघडतं?

आणि त्यातून समजा आपल्याला टीव्ही बघावासा वाटत असेल, तर आधी अभ्यास संपवून मग आईबाबांना विचारून बघा. अभ्यास झाल्यावर ते थोडा वेळ की बहुतेक टीव्ही बघायला देतील. पण त्यासाठी आधी दोन दिवस भरपूर अभ्यास तर करून दाखवा!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : 9112050500

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact