डॉ. श्रुती पानसे

Image: intelligentliving
आपल्या सगळ्यांना हे माहीत आहेच की, अभ्यास हा फक्त परीक्षेच्या वेळेस आणि परीक्षेच्यासाठीच करायचा नसतो. तो वर्षभर करायचा असतो.अनेकदा, परीक्षेच्या आधी सकाळी उठून, रिक्षा – बस मध्ये प्रवास करत असताना, अगदी शिक्षक खोलीमध्ये येईपर्यंत काही जण नोट्स वाचत असतात. काही मुलं शांतपणे शाळेत पोहचतात. पण इतर सगळेच वाचताहेत. असं बघून त्यांना पण असं वाटतं की हा जो वेळ मिळाला आहे, त्याचा उपयोग करावा. आणि जे जे सापडेल ते वाचून काढावं. पुस्तक, वही, नोट्स असं काहीही.
काही जण भराभरा पानं उलटत वाचत असतात. काही जण एखादंच पान शांतपणे वाचतात. काही जण स्वत:लाच समजून सांगत असतात. तर काही जण आत्ता वाचून पाठ करण्याचा प्रयत्न करत असतात. वास्तविक यामुळे डोक्यात काही शिरत असतं का?
जर आपला पुरेसा अभ्यास झाला आहे असं वाटत असेल तर परीक्षेच्या दिवशी घाईघाईने काही वाचण्याचा तसा उपयोग होत नसतो.
आपण जेव्हा वाचन करत असतो. तेव्हा वाचलेल्या एकेक शब्दांचं मेंदू आकलन करून घेत असतो. समजून घेत असतो. मग पुढचं वाक्य आपण वाचत जातो. अगदी गोष्टीचं पुस्तक वाचत असतो तेव्हाही ‘वाचलेलं कळणं’ ही एक पायरी फार महत्त्वाची असते. म्हणून शिक्षक किंवा आईबाबा आपल्याला सांगत असतात की – समजून वाच. असं वाचल्यामुळे ते खऱ्या अर्थाने मेंदूत शिरतं आणि अशा माहितीचा योग्य वेळी उपयोग होतो. त्यामुळे अक्षरांवरून नजर फिरवणं एवढंच पुरेसं नाही. किंवा खरं तर याला वाचन म्हणूच नये.
हेही वाचा!

image: freepik.
घाईघाईत नोट्स वाचल्या तर..
पुरेसा अभ्यास झालेला असल्यास असं घाईघाईनं वाचण्याची काही गरज नाही, तसंच अभ्यास झालेला नसेल तरी असं वाचून काही उपयोग होत नाही. त्यामुळे परीक्षेला गेल्यावर हातात पेपर पडेपर्यंत शांत राहावं. पेपर नीट सोडवण्याची मनाची तयारी करावी हेच उत्तम.
( लेखिका 'अक्रोड' उपक्रमाच्या संचालक आहेत.)
shruti.akrodcourses@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : 9112050500
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact