फिट्टंफाट बाॅडीसाठी करा पोटाचा अवघड पण आवश्यक व्यायाम!

तुम्हाला कोणत्या हिरोची बॉडी आवडते? सलमान खान, शाहरुख खान, आमीर खान, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ? काही जणांची बॉडी किती सॉल्लीड असते ना?

काहींच्या पोटावर तर त्या विटा असतात. कोणाच्या पोटावर सहा, तर काहींच्या तब्बल आठ-आठ! त्याला ‘सिक्स पॅक’, ‘एट पॅक’ असं म्हटलं जातं.

अनेकांना, विशेषत: मुलांना अशी तगडी, फिट्टंफाट बॉडी फार आवडते..पण त्यासाठी किती मेहनत, किती व्यायाम करावा लागतो, हे तुम्हाला माहीत आहे का?

सिक्स पॅक किंवा एट पॅकचं जाऊ द्या, त्याच्या वाट्याला आपल्याला चुकूनही जायचं नाही, पण पोटाचा व्यायामही आपल्यासाठी फार महत्त्वाचा.

असाच एक, दिसायला सोपा, पण करायला अवघड असा एक व्यायाम आज मी तुम्हाला सांगणार आहे. आपलं पोट आटोक्यात ठेवायचं असेल, मुख्य म्हणजे पोटाची ताकद वाढवायची असेल, तर हा व्यायाम खूप महत्त्वाचा.

याला इंग्रजीत म्हणतात प्लॅँक.

हेही वाचा!  

कसा करायचा प्लॅँक व्यायाम?

१- आपले हात, म्हणजे फोरआर्म्स, जमिनीवर टेकवा. हातांमध्ये खांद्याइतकं अंतर हवं.

२- आपल्या शरीराचं वजन हातांवर द्या.

३- बिलकुल हलू नका. पाठ आणि मान सरळ ठेवा.

४- आपली पाठ आणि शरीरही एका रेषेत असलं पाहिजे.

५- कंबर थोडीशी वर उचललेली हवी. पायांमध्येही थोडंसं अंतर आणि पायाची बोटं जमिनीवर टेकवा.

६- लक्षात ठेवा, आपल्या शरीराचं संपूर्ण वजन आपले फोरआर्म्स आणि पायाची बोटं यावर विभागलेलं असावं.

तुम्हाला जमेल तितकं, पण सध्या तरी तीस सेकंदाचा एक सेट यापेक्षा जास्त वेळ हा व्यायाम करू नका. नंतर आपोेआप तुमचा स्टॅमिना वाढेल. यामुळे तुमच्या पोटाची ताकद वाढेल. पाठदुखीचा त्रास असेल, तर तोही कमी होईल किंवा पाठ दुखणार नाही. तुमच्या मसल्सची लवचिकता वाढेल.

पण लक्षात ठेवा, तुमच्यासाठी सुरुवातीला ही लिमिट आहे फक्त तीस सेकंदांसाठी. त्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला जमलं तरी सुरुवातीला ते करू नका.

- ऊर्जा

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact