हवेत उड्या मारायच्या पण शिस्तीने. जम्पिंग जॅक्समुळे उड्यांना लागेल शिस्त!

Image: miko.ai

बसला ना ओरडा आज आई-बाबांचा? अरे उड्या तरी किती मारायच्या! बरं मारल्या जमिनीवर एकवेळ, तर ठीक आहे. गाद्यांवर, सोफ्यावर, बेडवर, पलंगावर.. इथेही उड्या? मग ओरडा बसणार नाही तर काय?

पण आज मी तुम्हाला एक अशी भारी आयडिया सांगणार आहे, त्यामुळे उड्या मारायची तुमची इच्छा तर पूर्ण होईलच, आई-बाबाही रागावणार नाहीत आणि फुकटात व्यायामही होऊन जाईल!

आज आपल्याला उड्याच मारायच्या आहेत, पण थोड्या वेगळ्या प्रकारच्या. या उड्यांचं नाव आहे ‘जम्पिंग जॅक्स’

हेही वाचा!

कशा माराल जम्पिंग जॅक्स

१.  सरळ उभे राहा. छाती ताठ. हात शरीराच्या बाजूला.

२. गुडघे थोडेसे वाकवा आणि मारा आता वर हवेत उडी.

३. पण नुसतीच नाही उडी मारायची. उडी मारताना वर जात असतानाच आपले दोन्ही हात आणि दोन्ही पायही एकाच वेळी साईडने वर गेले पाहिजेत.

४. आपली उडी खाली येताना, पुन्हा आपण मूळ पोझिशनला आलं पाहिजे.

५. यातला महत्त्वाचा भाग म्हणजे उड्या मारत असलो, तरी या उड्या धसमुसळ्या, गादी, सोफ्यावर मारतो, तशा नको. या उड्या अगदी स्मूदली झाल्या पाहिजेत.

६. विशेषत: आपली उडी खाली येत असताना ते आपल्या शरीरावर किंवा ढुंगणावर जोरात आपटायला नको. ते हलकेच खाली आले पाहिजेत.

७. उड्या मारत असलो, तरी आपल्यावर आपला कंट्रोल असला पाहिजे. एकही उडी वेडीवाकडी जाता कामा नये.

Image: lensaunders

हीच तर यातली गंमत आहे. बघा मारून या उड्या. यात आणखीही काही प्रकार आपल्याला करता येतात. पण ते आपण नंतर पाहू. तुमचे तुम्हालाही ते शोधून काढता येतील.

यामुळे आपल्या शरीराच्या बऱ्याच अवयवांना व्यायाम मिळतो. हात, पाय, पोट.. या उड्यांमुळे वजन आटोक्यात राहातं. चयापचय क्रिया सुधारते. हार्ट मजबूत होतं.

मारा आता या उड्या हव्या तेवढ्या. हो, पण सुरुवातीला किती? फक्त दहा. मग हळूहळू वाढवत न्या. आणि मग करा माझ्याशी कॉम्पिटिशन!

- ऊर्जा

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact