
Image: thejaipurdialogues
अर्णवला आज इतिहासाच्या टीचरने मजेशीर अभ्यास दिला होता. वर्गातल्या सर्व मुलांना आपल्या कुटुंबाचा इतिहास लिहून आणयला सांगितला होता. अर्णव घरी आला. आल्याबरोबर ऑफिसात गेलेल्या आई बाबांना त्याने फोन केला, ' आज इतिहासाच्या गृहपाठाला मला तुमची मदत लागणार आहे' असं सांगितलं. दोघांनीही होकार दिला. रात्री जेवणं आटोपल्यावर इतिहासाचा गृहपाठ करायचं ठरलं. त्याने आपल्या या गृह्पाठाबद्दल आजीलाही सांगितलं. आजीलाही हा विषय एकदम नवीन वाटला. ' अरे , आपल्या कुटुंबाचा इतिहास खूप मोठा आहे' असं म्हणत आजीने सांगायला सुरुवात केली. पण अर्णवने तिला थांबवलं आणि रात्री जेवण झाल्यावर आपण सर्व मिळून हा गृहपाठ करणार आहोत असं सांगितलं. रात्रीची जेवणं झाली आणि सर्वजण हाॅलमध्ये येवून बसले.
' कसं घडलं आपलं कुटुंब?' अर्णवने प्रश्न विचारला. आजीला तर दुपारपासूनच खूप काही सांगायचं होतं. त्यामुळे आजीनेच सुरुवात केली. तिने अर्णवच्या बाबांच्या पणजोबांपासूनच्या घटना, घडामोडी सांगितल्या. कुटुंबाचं मूळ गाव कुठलं, मूल व्यवसाय कुठला? तेव्हाची आर्थिक परिस्थिती कशी होती? शिक्षणानंतर कुटुंबातील माणसांनी कशी प्रगती केली, माणसं नोकरी, व्यवसायासाठी कुठे कुठे स्थायिक झाली हे सर्व तिने गोष्टीसारखं सांगितलं.
हेही वाचा!
मग बाबांनी आजोबा गेल्यानंतर त्यांच्या शिक्षणावर कसा परिणाम झाला, मोठ्या काकांनी कशी मदत केली? नोकरी करुन शिक्षण घेतल्याने काय काय अनुभव आले, कशी समज आली हे बाबांनी सांगितलं. हे सांगताना बाबांच्या चेहेऱ्यावर आनंद आणि अभिमान होता. आईने लग्न झाल्यावर कुटुंबात झालेल्या घडामोडी, तिने घेतलेले काही निर्णय, त्याचे झालेले परिणाम, मावशीचा अकाली मृत्यू, त्याचा तिच्यावर आणि आजी-आजोबांवर झालेला परिणाम सांगितला. हे सांगताना आई हळवी झाली. तिचा आवाज कापरा झाला. डोळ्यातही पाणी होतं तिच्या. आजी-बाबा- आई बोलत असताना एका बाजूला अर्णव वहीवर पटापट लिहून काढत होता. या इतिहासाच्या गप्पा चांगल्या दोन तास चालल्या. सकाळी सगळ्यांनाच लवकर उठायचं असल्यानं सर्वजण झोपायला गेले.
अर्णव सकाळी लवकर उठला. रात्री त्याने लिहिलेल्या नोट्सवरुन सर्व माहिती क्रमवारी लिहून काढली. लिहिल्यानंतर त्याने जेव्हा ते वाचलं तेव्हा आपण एखादी गोष्टच वाचत असल्याचा भास झाला. त्याने आणखी एक गंमत केली. त्याने लिहिलेल्या माहितीला धड्याचं स्वरुप दिलं. धड्याखाली जसे प्रश्न असतात, तसे प्रश्न त्याने काढले.
कधी एकदा इतिहासाच तास सुरु होतो आणि कुटुंबाचा इतिहास वाचून दाखवतो असं अर्णवला झालं होतं. टीचरने इतिहासाच्या तासाला रोल नंबरप्रमाणे मुलांना त्यांनी लिहून आणलेला कुटुंबाचा इतिहास वाचायला सांगितला. अर्णवचा न्ंबर आल्यावर अर्णवनेही तो वाचून दाखवला. सर्व मुलं प्रत्येकाच्या कुटुंबाचा इतिहास गोष्ट ऐकत असल्यासारखे ऐकत होते. या ॲक्टिव्हिटीच्या निमित्ताने मुलांना आपल्या मित्रांचे कुटुंब, त्यांच्या कुटुंबात घडलेल्या घटना, कुटुंब कशी बदलतात, का बदलतात, प्रत्येक कुटुंबाच्या परंपरा, संस्कृती याबद्दल बरंच काही ऐकायला मिळालं. सर्व मुलं एकदम खूष होती. मुलांच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहून टीचरलाही छान वाटलं. त्यांनी या ॲक्टिव्हिटीचा शेवट म्हणून इतिहास शिकणं का महत्त्वाचं असत्ं हे सांगितलं.
का शिकायचा इतिहास?

Image: newindianexpress

Image: medium.com
इतिहासाचा अभ्यास म्हणजे केवळ आठवणीत रमणं नव्हे. तर जे घडलं, ज्यांनी घडवलं त्यांच्याकडून काहीतरी शिकणं म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणं होय. इतिहासाच्या अभ्यासातून आपल्यामध्ये संशोधन दृष्टी विकसित होते. सखोल अभ्यास करण्याची सवय लागते. इतिहासाची सतत्य पुराव्यांवर अवलंबून असते. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करताना पुरावे शोधण्याची सवय होते. केवळ ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून कृती करण्याचा धोका टळतो.
इतिहासाच्या अभ्यासाचं महत्त्व सांगून झाल्यानंतर टीचरने सगळ्या मुलांना कुटुंबातल्या इतिहासातून तुम्ही काय काय शिकाल याबद्दल लिहून आणण्याचा गृहपाठ दिला. अर्णवसह सर्व मुलांना हा गृहपाठही जाम आवडला.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact