बुरशीचं रहस्यमय जग आणि तिचं विलक्षण काम तुम्हाला माहिती आहे का?

-- शिवान दर्डा

Image: earth.org

आपल्याखाली एक विलक्षण जग श्वास घेत आहे, हे आपल्याला माहिती आहे का? आपल्या शरीरातील उपरे जीव नाही तर हे बुरशीचं आपल्याला फारसं माहीत नसणारं मोठं जग आहे. बुरशी हे सेंद्रिय घटकांचं विघटन करण्यास सहाय्यभूत असणारी बुरशी ही वनस्पतींच्या बाबतीत त्यांच्या वाढीला बळ देणारी ठरते. बुरशी पर्यावरणीय वास्तूविशारद म्हणूज काम करते. सेंद्रीय घटकांचं विघटन आणि वनस्पतींच्या वाढीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या बुरशीचं जग मोठं रहस्यमय आणि गूढ आहे. बुरशीचं जग समजून घेताना ती पर्यावरणात ज्या भूमिका पार पाडते त्या समजून घेणं आवश्यक आहे.

बुरशी काय करते?

आपलं आरोग्य जपण्यात आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी बुरशी सतत क्रियाशील असते. सेंद्रिय घटकांच्या बाबतीत प्राथमिक  अपघटक असणारी बुरशी सेंद्रीय घटकांचं प्रभावीपणे विभाजन  करते. पोषण चक्रास प्रोत्साहन देते, मातीची सुपिकता वाढवते. जमिनीवरील पर्यावरणीय चक्र सुरळीत ठेवणे, सेंद्रिय घटकांचे विघटन करणे, त्यांना तोडणे, अपघटनाची क्रिया करुन महत्त्वाचे पोषक घटक बाहेर टाकणे हे काम बुरशीद्वारे होते. वनस्पतींच्या वाढीसाठी आणि पर्यावरणीय उत्पादकता वाढवण्यासाठीचे आवश्यक घटक  अपघटनाद्वारे बाहेर टाकण्याचे काम बुरशी करते. बुरशीच्या या अपघटनाच्या कार्यावर झालेले अभ्यास सांगतात की बुरशीचा जागतिक कार्बन चक्रावर मोठा परिणाम होतो. अपघटनाच्या आपल्या गुणधर्मामुळे वैश्विक पातळीवर बुरशी २० टक्के कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करते.

वनस्पती आणि बुरशीचं नातं अतिशय गुंतागुंतीचं असतं. वनस्पतींच्या बाबतीत बुरशी सहजीवनातला जोडीदार म्हणून आपली भूमिका पार पाडते. वनस्पती आणि बुरशीत असलेल्या सहसंबंधाला 'मायकोरिहझल असोसिएशन' असं म्हटलं जातं. वनस्पतींच्या वाढीसाठी बुरशी  मदत करते.  वनस्पतीच्या मुळांवरील कवकतंतूचं जाळ मातीपर्यंत विस्तारलेलं असतं. त्याचा उपयोग वनस्पतीला मातीतून पाणी आणि आवश्यक पोषकद्रव्ये शोषून घेण्यास होतो. ९० टक्के वनस्पतींच्या प्रजातींचं मूलकवक बुरशीशी नातं असतं. बुरशी पृथ्वीवरील पर्यावरणीय रचनेला आधार देते आणि शेतीस सहाय्यभूत ठरुन उत्पादन वाढवते.

बुरशी म्हणजे जैवविविधतेची सूत्रधार आहे. छोट्या किटकापासून सस्तन प्राण्यांच्या शरीराच्या रुपाने बुरशी असंख्य किटकांना अधिवास पुरवते. ट्रफल्स, मशरुम्स हे बुरशीचे प्रकार अनेक प्रजातींना अन्न आणि पोषक घटक पुरवतात. पर्यावरणीय स्थिरता राखण्यास बुरशी मदत करते. पृथ्वीवरील पर्यावरणाची संरक्षक म्हणून बुरशी काम करते. जगण्याचं गुंतागुंतीचं जाळं विणणारी बुरशी तिचे पर्यावरणीय संदर्भातील गुणधर्म, उपयुक्तता आणि तिची भूमिका समजून घेवून बुरशीच्या वैविध्याचं संरक्षण करण्याची, त्याबद्दल जागरुकता वाढवण्याची गरज आहे. 

 Image: courses.lumenlearning

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact