अभ्यासात ब्रेक हवाच! ब्रेक घेतल्याने म्हणे अभ्यास छान होतो. तो कसा?

Image: freepik.com

अभ्यास करण्याची/ शिकण्याची/ शिकण्याची प्रत्येकाची एक विशिष्ट स्टाइल असते. फिनलंड या देशात शाळेत मुलांना शिकवण्याची विशिष्ट पध्दत आहे. ॲंथनी पेलिग्रीनी हे अमेरिकेतील शिक्षक. ते नंतर फिनलंड देशात राहाण्यास गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी फिनलंडमधील शाळेमध्ये नोकरी पकडली. पेलिग्रीनी हे फिनलंडमधल्या शाळेत शिकवायला जायला लागले. ते अमेरिकेत ज्या पध्दतीने शिकवतात त्याच पध्दतीने फिनलंडमधील शाळेत शिकवू लागले. ४५ मिनिटांचा एक तास. असे तासामागून तास ते घ्यायचे आणि तीन -चार तास झाल्यावर मुलांना ३० मिनिटांचा ब्रेक द्यायचे. दोन तीन दिवसानंतर पाचवीत शिकणारा सामी नावाचा मुलगा वैतागून उठला, ' अशा प्रकारे मी अभ्यास केला तर माझं डोकं फुटेल, ही अशी शिकण्याची आम्हाला सवय नाही!' असं त्या शिक्षकांना म्हणाला. पेलिग्रीनी यांना कळलंच नाही की हा मुलगा इतका का वैतागला? वर्गातली बाकीची मुलं सामीसारखी बोलली नसली तरी त्यांच्या चेहेऱ्यावर तो वैताग पेलिग्रीनी यांना दिसला. मुलं ओढून ताणून वर्गात बसलेलीही त्यांना दिसली.

 हेही वाचा! 

हे असं का होतंय? हे जरा समजून घेण्यासाठी पेलिग्रीनी यांनी वर्गातल्या मुलांना जवळ बोलावलं, त्यांच्याशी गप्पा मारल्या. या गप्पांमधून पेलिग्रेनी यांना मुलाच्या वैतागाचं खरं कारण समजलं. फिनलंडमधील शाळेत ४५ मिनिटांचा एक तास संपला की मुलं १०-१५ मिनिटांचा ब्रेक घेवून बाहेर मैदानात जातात. खेळतात, उड्या मारतात. मित्रांशी गप्पा मारतात. ब्रेक संपला की पुन्हा तासाला येवून वर्गात बसतात. पेलिग्रीनी यांनी मग मुलांना प्रत्येक तासानंतर १०-१५ मिनिटांचा ब्रेक द्यायला सुरुवात केली. ब्रेक सुरु केल्यानंतर मुलांच्या वागण्या-बोलण्याच्या, शिकण्याच्या पध्दतीत खूप फरक पडला. मुलं तासाला उत्साही दिसू लागली. शिकवताना चांगलं लक्ष देवू लागली. शिकताना मध्ये छोटे छोटे ब्रेक देणे ही फिनलंड येथील शिकवण्याच्या पध्दतीचं एक वैशिष्ट्य आहे.

तासनतास एका जागी बसून शिकणं हे जसं चुकीचं तसंच जागेवरुन न हलता सलग अभ्यास करणं हेही चुकीचंच. पण विहानच्या आईला हे कुठे माहित होतं. एकदा अभ्यासला बसलं की सगळ्या विषयांचा अभ्यास करुन मगच उठायचं. मग अभ्यासाला दोन तास लागू देत नाही तर चार तास. हा विहानच्या आईचा नियम होता. पण त्यामुळे विहान मात्र अभ्यास करताना कंटाळायचा. सोप्या गोष्टीही त्याला समजून घ्यायला अवघड जायच्या. रडत खडत अभ्यास पूर्ण करणाऱ्या विहानला अभ्यास करताना मजाच यायची नाही. तासनतास एका जागेवर बसून अभ्यास करणाऱ्या विहानचा गृहपाठ तर कसाबसा पूर्ण व्हायचा पण परीक्षेत मात्र विहानला कमी गुण पडायचे. विहानच्या बाबतीत हे असं का होतंय? हे विहानच्या आईला समजत नव्हतं. अभ्यास करताना विहानचं थकण्याचं, मलूल होण्याचा कारण म्हणजे विहानला अभ्यासात न मिळणारा ब्रेक. अभ्यास नीट व्हायचा असेलल तर अभ्यासात थोड्या थोड्या वेळाने छोटे ब्रेक घेणं गरजेचे असतं असं खुद्द अभ्यास विषयातले तज्ज्ञ देखील म्हणतात. चांगला अभ्यास होण्यासाठी अभ्यास आणि ब्रेक या दोन्ही गोष्टीत योग्य बॅॅलन्स होणं महत्त्वाचं असतं.

अभ्यासात ब्रेक का महत्वाचा?

 ब्रेक घेतल्याने स्मरणशक्ती आणि अभ्यासातलं लक्ष देणं या दोन्ही गोष्टी वाढतात. जो अभ्यास केला जातो, तो नीट आणि सहजपणे समजतो.

सलग अनेक तास अभ्यास केल्याने थकवा जाणवतो. अभ्यास करु नये असं वाटायला लागतं. पण थोडा वेळ ब्रेक घेतल्याने अभ्यास करुन मनावर आलेला ताण कमी होतो. ब्रेक घेतल्याने नंतर पुन्हा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते. इच्छा होते.

एका जागेवर तासनतास बसल्याने पाठीच्या-मानेच्या स्नायूंवर ताण पडतो. पण अभ्यास करताना थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घेतला, ब्रेकमध्ये बाहेर जावून जरा फिरुन आल्याने, थोडं खेळल्याने स्नायू आणि सांध्यावर आलेला ताण निघून जातो. छान रिलॅक्स वाटायला लागतं. ब्रेकमुळे मूड छान आनंदी होतो. फ्रेश होतो.

 Image: vectorstock

 हेही वाचा! 

तासनतास सलग अभ्यास केल्याने मनावर , मेंदूवर ताण येतो. पण मध्ये ब्रेक घेतला की मेंदूवरचा सगळा ताण निघून जातो. त्यामुळे फ्रेश मूडने अभ्यासाला पुन्हा बसता येतं.

ब्रेक न घेता सलग अभ्यास केला की अभ्यासातल्या अवघड गोष्टी समजून घेण्यात अडचणी येतात. कारण आपला मेंदू खूप थकलेला असतो. अशा परिस्थितीत सोप्या गोष्टी देखील अवघड वाटायला लागतात. पण अभ्यास करताना मध्ये ब्रेक घेतला की मेंदूचा थकवा निघून जातो आणि अवघड गोष्टी समजून घेण्यासाठी मन एकाग्र करता येतं. अवघड विषय समजून घेणं जमतं कारण ब्रेक मध्ये मिळालेल्या ऊर्जेने मेंदूची ताकद वाढलेली असते.

अभ्यासात ब्रेक कसा घ्यायचा?

अभ्यासात ब्रेक कसा घ्यायचा याचा निर्णय आपण स्वत: घेवू शकतो. आपली अभ्यास करण्याची पध्दत, अभ्यास किती आहे यावर आपण ब्रेक कधी घ्यायचा हे ठरवू शकतो. एका दिवशी एकाच विषयाचा अभ्यास करण्याची सवय असेल तर एक धडा झाला, किंवा धडा मोठा असल्यास धड्यातलं एखादं प्रकरण (चॅप्टर) संपलं की मध्ये १०-१५ मिनिटांचा ब्रेक घेता येतो.

एका दिवशी अनेक विषयांचा अभ्यास करणार असू तर एका विषयाचा अभ्यास झाला की ब्रेक घ्यावा. ब्रेक नंतर मग दुसऱ्या विषयाचा अभ्यास करावा.

अभ्यासात ब्रेक महत्त्वाचा. तो घेण्यास विसर पडू नये म्हणून विशिष्ट वेळेनंतर ब्रेकची आठवण करुन देणारा अलार्म लावावा.

Image: freepik.com

अभ्यास करण्याची/ शिकण्याची/ शिकण्याची प्रत्येकाची एक विशिष्ट स्टाइल असते. फिनलंड या देशात शाळेत मुलांना शिकवण्याची विशिष्ट पध्दत आहे. ॲंथनी पेलिग्रीनी हे अमेरिकेतील शिक्षक. ते नंतर फिनलंड देशात राहाण्यास गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी फिनलंडमधील शाळेमध्ये नोकरी पकडली. पेलिग्रीनी हे फिनलंडमधल्या शाळेत शिकवायला जायला लागले. ते अमेरिकेत ज्या पध्दतीने शिकवतात त्याच पध्दतीने फिनलंडमधील शाळेत शिकवू लागले. ४५ मिनिटांचा एक तास. असे तासामागून तास ते घ्यायचे आणि तीन -चार तास झाल्यावर मुलांना ३० मिनिटांचा ब्रेक द्यायचे. दोन तीन दिवसानंतर पाचवीत शिकणारा सामी नावाचा मुलगा वैतागून उठला, ' अशा प्रकारे मी अभ्यास केला तर माझं डोकं फुटेल, ही अशी शिकण्याची आम्हाला सवय नाही!' असं त्या शिक्षकांना म्हणाला. पेलिग्रीनी यांना कळलंच नाही की हा मुलगा इतका का वैतागला? वर्गातली बाकीची मुलं सामीसारखी बोलली नसली तरी त्यांच्या चेहेऱ्यावर तो वैताग पेलिग्रीनी यांना दिसला. मुलं ओढून ताणून वर्गात बसलेलीही त्यांना दिसली.

ब्रेक किती वेळाचा?


अभ्यास करताना मध्ये मध्ये छोटे ब्रेक महत्त्वाचे. पण तो किती वेळ घ्यायचा हे ही महत्त्वाचं आहे. समजा एका विषयाचा अभ्यास करुन जर सहा तासांचा ब्रेक घेतला तर त्याचा अभ्यासावर वाईट परिणाम होतो. इतक्या मोठ्या ब्रेकने अभ्यासातलं मन उडतं. एवढ्या मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा बसून अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. अभ्यासातला ब्रेक हा ५ मिनिटं ते ३० मिनिटांचा हवा. या ब्रेकमध्ये मेंदू रिलॅक्स होतो. रिचार्ज होतो. आधी केलेला अभ्यास लक्षात राहातो. आकलन वाढतं. पुढचा अभ्यास करण्याची ताकद वाढते.

Image : freepik

ब्रेकमध्ये काय कराल?

अभ्यास करुन आलेला थकवा घालवण्यासाठी एक छोटी डुलकी घेता येते. या थोड्याशा झोपेमुळेही छान फ्रेश वाटायला लागतं.

बाहेर पडून थोड्या वेळ चालून येणे. यामुळे डोळ्यांसमोरचं दृश्य बदलतं. आपल्याला माणसं, झाडं, फुलं, पक्षी दिसतात. यामुळेही अभ्यास करुन आलेला मनावरचा ताण हलका होतो.

ब्रेकमध्ये थोडा व्यायाम करावा.  व्यायामामध्ये विशिष्ट स्ट्रेचिंगचे प्रकार केल्यास स्नायूंवरचा ताण निघून जातो. पुन्हा अभ्यास करण्याची ताकद वाढते. व्यायामानंतर अभ्यासात चांगलं लक्ष लागतं.

 ब्रेकमध्ये थोडंसं घरातलं काम केल्याने अभ्यासाने आलेला थकवा निघून जातो. ब्रेकमध्ये आपली खोली स्वच्छ करणे, पुस्तकांचं, कपड्यांचं कपाट नीटनेटकं करणं, थोडी आईला मदत करणे ही कामं करता येतात.

 ब्रेकमध्ये घरातल्या व्यक्तींशी बोलणं किंवा मित्र मैत्रिणींना फोन करुन तांच्याशी बोलण्याने, थोड्या गप्पा मारल्याने अभ्यास करुन स्मरणशक्तीवर आलेला ताण निघून जातो. नवीन काही गोष्टी शिकण्यासाठी, त्या लक्षात ठेवण्यासाठी स्मरणशक्तीची ताकद वाढते.

बॅड ब्रेक नको!

 अनेक तासांचा ब्रेक, छोट्या डुलकी ऐवजी दोन तीन तास झोपणे , अभ्यासाच्या वेळेपेक्षा ब्रेकचा वेळ जास्त असणे यामुळे अभ्यासातलं लक्ष उडतं. केलेला अभ्यासही नीट लक्षात राहात नाही.

 ब्रेकमध्ये फोन उघडून फेसबुक, इन्स्टाग्राम पाहात बसणं. यामुळे मनावरचा ताण कमी तर होत नाही उलट नवीन ताण येतो. शिवाय डोळ्यांवर ताण येवून डोळेही थकतात.

 ब्रेकमध्ये सटरफटर, चटपटीत पदार्थ पोटभरुन खाणे चुकीचे. यामुळे पोट गच्च होतं. सुस्ती येते. पुन्हा अभ्यासाला बसण्याचा कंटाळा येतो.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact