- डॉ. वैशाली देशमुख

Image: freepik
ईशानं ओरडून आईला सांगितलं, ‘आई, मी आले गं.’ ईशाचा आवाज ऐकताच आई बाहेर आली आणि ईशाला जवळ घेत कुरवाळलं..‘आलं का माझं लेकरु.. दमलंय वाटतं फार!’ म्हणत तिचे लाड करायला सुरुवात केली. ईशाला आई समोर हवी होती मात्र आई करत असलेले असे लाड नको होते. ‘आईss, नको ना.’ असं म्हणत ईशानं आईच्या मिठीतून सुटका करून घेतली.
यातली ईशा म्हणजे तुमच्यातली कुणीही मुलगी असेल. लहानपणी आई-बाबांच्या कुशीत झोपायचा हट्ट करणाऱ्या तुम्ही, आता मात्र त्यांना दूर ढकलू द्यायला बघता. तुम्हाला कळत असतं की, आपण असं केल्याने आईला वाईट वाटलंय, पण तरीही तुम्ही तसं करता, कधी कधी आईवर ओरडता देखील.
हेही वाचा!
मुली मोठ्या होतात तेव्हा..
खरंतर मोठ्या होत जाणऱ्या तुम्हा मुलींच्या मनात एक छोटं मूल दडलेलं असतं. त्या छोट्या मुलीला आईची मिठी हवीहवीशी वाटते. रात्री भयानक स्वप्न पडलं की, मोठ्या मुलीत दडलेल्या त्या छोट्या मुलाला आईजवळ जाऊन झोपावं, असं वाटतं. आईनं डोक्याला तेल लावून मालीश करून दिलं की मस्त गुंगी येते. पण तुमच्यात एक प्रौढ, मोठं होणारं मूल पण लपलंय. त्या मोठ्या मुलीला मात्र हे बालिश प्रकार नकोसे वाटतात. आपण आता मोठे झालोय हे त्यांना कळत असतं आणि हाच निरोप त्यांना लहान मूल म्हणूनच प्रेम करणाऱ्या आईबाबांपर्यंत पोचवायचा असतो. मग अशा छोट्या छोट्या प्रसंगातून मुली आपण मोठ होत असल्याचं आई बाबांवर, घरातल्या मोठ्यांवर बिंबवतात.
या मोठ्या होत असलेल्या मुलींना आता भावंडांशी मस्ती करायलाही आवडत नाही . हं, पण मैत्रिणींच्या गळ्यात गळे घालून फिरायला मात्र आवडतं. कारण मोठ्या होत जाणाऱ्या तुम्हा मुलींच्या आयुष्यातलं त्यांचं महत्त्व वाढलेलं असतं.

Image: freepik
हेही वाचा!
स्पर्श महत्त्वाचा.. त्याला ओळखा!
तुम्हाला माहितेय? स्पर्श ही माणसाची एक गरज आहे. एखाद्या गोंडस मांजराच्या पिल्लाला उचलून घेतलं की किती छान वाटतं ना? किंवा खूप दिवसांनी भेटलेल्या मैत्रिणीला मिठी मारल्यावर? अशा वेळी तुमच्या मेंदूत चक्क काही रसायनं झरत असतात. त्यातलं मुख्य म्हणजे ऑक्सीटोसीन! आई बाळाला जवळ घेते तेव्हाही हेच रसायन झरतं. या ऑक्सीटोसीनमुळे मायेचे दुवे जोडले जातात. एकांतवासाची शिक्षा सगळ्यात भयानक समजली जाते, कारण तिथे कुणा माणसाशी संपर्कच होत नाही.
मोठं होताना काही स्पर्श नकोसे तर काही वेळा काही स्पर्श खूप हवेहवेसे वाटतात. तुमच्यातली हॉर्मोन्स तुमच्यातल्या या भावना जाग्या करतात. एखादी मुलगी प्रेमात पडते. कधीतरी चुकून मित्राचा स्पर्श होतो आणि मनात एकदम व्हायोलिन वाजायला लागतं. आता तो नुसता मायेचा स्पर्श राहात नाही, त्याला लैंगिक बाजू पण असते. काही वेळा ही ओढ इतकी जबरदस्त असते की आजूबाजूला कुणी नसेल तर तुमच्यातल्या एकाला अजून जवळचा स्पर्श करण्याची इच्छा होऊ शकते.
तुम्हाला माहिती असेल बहुतेक की आपल्या भारतात POCSO नावाच्या कायद्यानुसार अठरा वर्षांच्या खाली अशा लैंगिक क्रियांना गुन्हा समजलं जातं. त्यामुळे कितीही छान वाटलं तरी हे स्पर्श करताना नीट विचार करा. आणि हो, आज घरी जाल तेव्हा आईला एक जादूकी झप्पी द्यायला विसरू नका!
(लेखिका बालरोगतज्ज्ञ असून किशोरवयीन मुलांविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.)
vrdesh06@gmail.com
आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा... तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact